औरंगाबाद सहायक पोलिस आयुक्तपदी सांगलीचे बनकर; वाचा मराठवाड्यातील पोलिस दलात झालेले बदल !

सुषेन जाधव
Thursday, 1 October 2020

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

औरंगाबाद :  सेवेचा कार्यकाळ संपुष्टात आलेल्या राज्यातील पोलिस अधीक्षक, उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील ४१ उपायुक्तांच्या तर १२० सहायक पोलिस आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये औरंगाबादेतील शहर पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांची औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील उपविभागीय अधिकारी विवेक सराफ यांची शहर पोलिस आयुक्तालयाच्या सहायक पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच सांगली, तासगाव येथील अशोक बनकर हे नव्याने सहायक पोलिस आयुक्त म्हणून पोलिस आयुक्तालयात दाखल होणार आहेत.
 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील ही पोलिस अधिकाऱ्यांचा या बदली आदेशात समावेश आहे. यामध्ये उस्मानाबाद जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपअधीक्षक सचिन सावंत यांची नवी मुंबई येथे सहायक पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कंसात सध्याचे ठिकाण, तर बाहेर नविन नियुक्तीचे ठिकाण 

पोलिस अधिकारी - सध्याचे ठिकाण - बदलीचे ठिकाण 

 

 • धनंजय पाटील - उपविभागीय पोलिस अधिकारी इतवारा उपविभाग नांदेड- उपविभागीय पोलिस अधिकारी भोर, (जि.पुणे). 
 •  
 • विवेक सराफ - पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय), औरंगाबाद ग्रामीण- सहायक पोलिस आयुक्त, औरंगाबाद शहर . 
 •  
 • पोपट यादव - पोलिस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, लातूर- सहायक पोलिस आयुक्त, मुंबई शहर. 
 •  
 • बलराज लंजिले- उपविभागीय पोलिस अधिकारी, गंगाखेड (परभणी)- उपविभागीय पोलिस अदिकारी अहमदपूर (लातूर). 
 •  
 • सुरेश पाटील- उपविभागीय पोलिस अधिकारी (कळंब)- उपविभागीय पोलिस अधिकारी (माजलगाव, बीड). 
 •  
 • गुणाजी सावंत - सहायक पोलिस आयुक्त, कंन्टोंमेंट विभाग (औरंगाबाद)- सहायक पोलिस आयुक्त मुंबई शहर. 
 •  
 • राहूल धस - उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबाजोगाई- उपविभागीय पोलिस अधिकारी, दौंड, (जि. पुणे). 
 •  
 • सुनिल जायभाय - उपविभागीय पोलिस अधिकारी, भोकरदन, जालना - उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबाजोगाई.
 •  
 • गणेश रामचंद्र किंद्रे - पोलिस उपअधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद- उपविभागीय पोलिस अधिकारी, कोरेगाव (सातारा). 
 •  
 • रामेश्‍वर वैंजने- उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर उपविभाग, हिंगोली- उपविभागीय पोलिस अधिकारी, जयसिंगपूर उपविभाग. 
 •  
 • अमोल गायकवाड- उपविभागीय पोलिस अधिकारी, परभणी ग्रामीण उपविभाग- उपविभागीय पोलिस अधिकारी, कळवण (जि. नाशिक). 
 •  
 • श्रीकांत डिसले- उपविभागीय पोलिस अधिकारी, माजलगाव (बीड)- पोलिस उपअधीक्षक, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, नागपूर. 
 •  
 • श्रीकृष्ण कर्डिले- उपविभागीय पोलिस अधिकारी, पूर्णा (परभणी) - पोलिस उपअधीक्षक नागरी हक्क संरक्षण, ठाणे. 
 •  
 • सुनील पाटील- उपविभागीय पोलिस अधिकारी, धर्माबाद (नांदेड)- उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबड, (जि. जालना). 
 •  
 • जगदीश सातव- उपविभागीय पोलिस अधिकारी, कन्नड - सहायक पोलिस आयुक्त, ठाणे शहर. 
 •  
 • एम. व्ही. जवळकर- उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर (जि. लातूर) - सहायक पोलिस आयुक्त, मुंबई शहर. 
 •  
 • सचिन सांगळे- उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर उपविभाग- उपविभागीय पोलिस अधिकारी, शेवगाव (नगर). 
 •  
 • इंदल बहूरे- पोलिस उपअधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, परभणी- उपविभागीय पोलिस अधिकारी, भोकरदन. 
 •  
 • गोपाळ रांजणकर- उपविभागीय पोलिस अधिकारी, वैजापूर (औरंगाबाद)- उपविभागीय पोलिस अधिकारी, भोकर, नांदेड. 
 •  
 • डॉ. निलेश देशमुख- उपविभागीय पोलिस अधिकारी, निलंगा (लातूर)- उपविभागीय पोलिस अधिकारी, दहीवडी (सातारा). 
 •  
 • रामचंद्र जाधव - सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड - पोलिस उपअधीक्षक, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, जालना. 
 •  
 • अशोक बनकर- उपविभागीय पोलिस अधिकारी, तासगाव - सहायक पोलिस आयुक्त, औरंगाबाद शहर. 
 •  
 • प्रविण पाटील- उपविभागीय पोलिस अधिकारी, खेड (रत्नागिरी) - उपविभागीय पोलिस अधिकारी, वसमत (हिंगोली) 
   

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok bankar new Assistant Commissioner of Police Aurangabad