बापरे! अशी आहे एटीएममध्ये घुसणारी गड्डी गँग

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : मदतीच्या बहाण्याने एटीएममध्ये घुसून हातचलाखीने कार्डची अदलाबदल करत दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन हजारो रूपयांवर डल्ला मारणाऱ्या कल्याण येथील गड्डी गँगच्या तिघांना वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले़. परवेज अकबर अली शेख (28), प्रदीप साहेबराव पाटील (30), किरण कचरू कोकणे (32, सर्व रा़. म्हारळ गाव, ता़ कल्याण, जि़. ठाणे) अशी या गँगच्या सदस्यांनी नावे आहेत़. 

एटीएम मशीन शोधून त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना हेरण्याचे काम या गड्डी गँगचे सदस्य परवेज शेख, प्रदीप पाटील आणि किरण कोकणे करत़ एटीएमच्या बाजूबाजूला उभे राहून कोणी व्यक्ती पैसे काढण्यासाठी घुसला की त्याला काही अडचणी आल्या, की हे दोघे तिघे त्याठिकाणी जमायचे आणि त्या व्यक्तीला मदत म्हणून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने त्याच्या जवळ जायचे़.

पैसे निघाले तर ठिक नाही तर त्याच्याकडून पिन नंबर घेऊन एटीएम कार्डाची अदलाबदल करायचे़. ओरिजनल एमटीएम कार्ड मिळाल्यावर तेथून ते तातडीने दुसऱ्या एटीएम सेंटरवर जायचे़. त्या ओरिजनल एमटीएम कार्डद्वारे त्याचा पिन नंबर टाकून दहा हजार ते 25 हजारांपर्यंत रक्कम काढून पसार होत़.  

औरंगाबादेत नोव्हेंबरमध्ये 24 हजार काढले

पैठण-औरंगाबाद रोडवरील गेवराई येथील रहिवासी सिराज बुढाण शेख हे 14 नोव्हेंबरला औरंगाबादेत आले होते़ रेल्वेस्टेशन परिसरातील एमटीएम सेंटरवर जावून ते पैसे काढत होते़ त्याठिकाणी सिराज शेख यांना तिघांनी हेरले़ पैसे निघत नसल्याने पैसे काढण्यास त्यांनी मदत केली़ सिराज शेख यांना 10 हजार रूपये काढून दिले़ मात्र, एमटीएम कार्ड देताना बनावट एटीएम कार्ड सिराज शेख यांच्या हाती टेकविले़. 

तिघांनीही एटीएम कार्ड हातात पडल्यावर समर्थनगर येथील गणपती मंदिराच्या परिसरात जावून रोख 10 हजार रूपये काढले़ तेथून पुढे ते शिवूरबंगला येथील एका पेट्रोल पंपावर गेले़ त्या पेट्रोल पंपावाल्याकडून 14 हजार रूपये रोख घेतले़ त्याऐवजी एटीएम कार्ड त्या ठिकाणी स्वॅप केले़ अशा प्रकारे 24 हजार रूपये सिराज शेख यांचे गेले होते़ या गड्डी गँगनेच हा कारनामा केला होता़ सिराज शेख यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़ या प्रकरणाचा तपास वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल भदरगे करत होते़ 

कल्याणमध्ये मिळाले लोकेशन

एटीएम मशीन मधून पैसे काढताना तिघेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते़ या फुटेजवरून त्यांचा शोध घेत असताना कल्याण (जि़ ठाणे) या परिसरातील काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली़ पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर भागातील आरोपींच्या संदर्भाने काही फुटेज स्थानिक पोलिसांना पाठविले़.

यात पोलीस ठाणे उल्हासनगर येथे यातील दोघे संशयीत हे पिस्तुल बाळगल्याच्या प्रकरणात अडकले होते़ वेदांतनगर पोलिसांना हेच ते आरोपी असल्याचे कळाल्यावर त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक राहुल भदरगेसह चार जणांची टीम तातडीने ठाण्याला पाठविली़ तेथून परवेज अकबर अली शेख, प्रदीप साहेबराव पाटील, किरण कचरू कोकणे यांना ताब्यात घेतले़

औरंगाबादसह, जालना, नांदेडमध्ये गुन्ह्यांची कबुली

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने घुसून हातचालाकीने एटीएम कार्डची अदलाबदल करून औरंगाबादसह जालना, नांदेड आणि इतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली  परवेज अकबर अली शेख याने दिली़ यात परवेश हा मास्टर माईंड आहे़ कल्याण येथील हे तिघे निघाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून लाखो रूपयांची रोख घेऊन ते मुंबईत पाय ठेवत होते़.

पैसे मिळाल्यावर मुंबईत मौजमजा ही गँग करत होती़ सदर कारवाई पोलीस आयुक्त चिरंजिव प्रसाद, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल भदरगे, पोलीस कर्मचारी हबीब शेख, बनसोडे, अतुल सोळंके यांनी केली़ 

गड्डी गँगचे तिघे सदस्य

कल्याण, उल्हासनगर, ठाणे या भागात लोकांना दामदुप्पट करून देण्याचे अमिष दाखविणारी ही गड्डी गँग सक्रीय आहे़ लोकांना खऱ्या 20 हजार रूपयांचे 40 हजार रूपये करून देणारी ही गड्डी गँग आहे़ 40 हजार रूपये देताना त्याला पैशाच्या गड्ड्या देताना वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला खऱ्या नोटा लावल्या जात मध्ये नुसते कागदी गड्डी असते़ हे लोकांना आमिष देणारी गड्डी गँग आहे़ याच गड्डी गँगचे हे तिघे सदस्य आहेत़

वेगवेगळ्या कलरचे एटीएम

तिघांकडे वेगवेगळ्या कलरचे एटीएम कार्ड होते़ वेगळ्या बँकेचे वेगळ्या रंगाचे कार्ड ते गँगमधील सदस्यांकडून घेत़ एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे कोणत्या रंगाचे एटीएम आहे़ हे ते बघून घेत़  तशा रंगाचे कार्ड वर काढत़ एटीएममध्ये आलेल्या व्यक्तीच्या हातात हातचालाकीने बनावट एटीएमकार्ड देऊन ओरिजनल कार्ड घेऊन हे पसार होत़ समोरच्या व्यक्तीला एसएमएस येईपर्यंत पैसे काढत़ ज्यांना एसएमएस येत नाही त्यांचे तर 40 हजारांपर्यंत पैसे त्यांनी काढले आहेत़. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com