ट्रेंडस ऑडीओ बुक्सचा : वाचण्यापेक्षा ऐकण्याकडे वाढला कल!

000audio.jpg
000audio.jpg

औरंगाबाद : रस्त्याने जाताना, फेरफटका मारताना वा ईतर वेळी पुस्तके वाचता येतातच असे नाही. पण त्याच पुस्तकांतील माहिती अगदी तुमच्या कानात पडत असेल तर ते कुणाला नकोय. पुस्तके वाचनाला वेळ नसेल तर ती ऐकायला कामात असतानाही वेळ मिळु शकतो व हिच ताकद ऑडीओ बुक्समध्ये आहे. हल्ली ऑडीओ बुकचा ट्रेंड्स वाढत असुन आता पुस्तकांनीही इ-प्लटफार्म गाठला आहे. 

पुस्तकांची आवड असलेल्या व्यक्तींना हल्ली पुस्तके वाचताच येतात असे नाही. जीवन गतीमान झाले, हल्ली वेळही भेटत नाही. त्यामुळे अनेक जण आवड असुनही पुस्तकांपासुन दूरावत आहे. त्यामुळे ऑडीओ फॉर्मेटमधील पुस्तके ऐकण्याचा ट्रेंड् आता आला आहे व तो सातत्याने वाढतच आहे. प्रवासात व इतरवेळीही ऑडीओ फॉर्मेटमधील पुस्तके ऐकता येतात. पुस्तकातील कंटेंट आवश्‍यक सांगितिक ध्वनीनुसारही ते ऐकता येऊ शकेल. अशी हि संकल्पना आहे, आयफोन व अपडेटेट अ्ॅन्ड्राईड व्हर्जनमुळे डेटा स्पीडमध्ये वाढ झाली. त्यानंतर ऑडीओ बुक्स या क्षेत्राची वाढ सुरु झाली. पुर्वी वगनाट्य, पोवाड्यातून चरित्र कथन करणे हे प्रकार कॅसेट्सच्या माध्यमातून ऐकले जात होते. पण कॅसेट्सची जागा सीडी व नंतर विविध अद्यावत उपकरणांनी घेतली. पुस्तके असो की, इतर माहिती याला मल्टीमिडीया मोबाईलचा प्लॅटफार्म मिळाला व त्यातुन ऑडीयो बुक्सही नवीनतम संकल्पनांचे अॅपही उदयास आले. 

ठळक बाबी 
- पुस्तक वाचनांबाबत अनास्था असलेल्या व्यक्तींसाठी सोईचे. 
- प्रवासातही ऐकण्यास सोईचे आहे. 
- पुस्तकाला व्हाईस निवडला जातो. त्यानंतर व्यावसायिक रेकार्डींगही होते. 
- हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेतही ऑडीओ बुक्स उपलब्ध आहेत. 
- उर्दू, मल्याळम, तामीळ, कन्नड, तेलगु, बंगाली भाषेतही साहित्यही ऐकता येते. 
- पर्सनल डेव्हलपमेंट, अर्थ व व्यवसाय, वैयक्तीक विकास, धर्म व अध्यात्म, शॉर्ट स्टोरीज अशा विविध बाबींना इप्लॅटफार्म तयार आहे. 

इंटरनेट क्रांतीनंतर संकल्पनेला वेग 
ऑडीओ बुक्सही संकल्पना २००५ दरम्‍यान बाल्य अवस्थेत होती. लोक आधी ऑडीओ बुक डाऊनलोड करुन ऐकायचे. २०१० नंतर स्ट्रिमींग ऑडीओ बुक सेवा सुरु झाली. ती जगातील पहिली ऑडीओ बुक सेवा होती. यानंतर आयफोन आला. त्यामुळे डेटा स्पीडमध्ये फरक पडला व तेथून वाढ सुरु झाली. लाखो लोक महिण्याला पैसे देऊन पुस्तके ऐकतात. 
 

(Edited by Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com