पन्नास रुपयांची क्वॉर्टर विकली दोनशेला 

मनोज साखरे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

अल्पवयीन मुलाचे तीन साथीदार पसार आहेत. या मुलाने त्याच्या साथीदारासोबत सातपैकी पाच देशी दारूचे बॉक्स विकले. एक दारू बाटली साधारणतः पन्नास रुपयांना असताना लॉकडाऊनच्या काळात संधीत हात ओले करीत त्यांनी दारू बाटली चक्क दोनशे रुपयांना विकली. 

औरंगाबाद - कोरोनाचा प्रार्दुभाव आणि लॉकडाऊन अनेकांच्या पथ्यावर पडत असताना चोरांचा मात्र सुकाळ सुरूच आहे. या काळात लॉकडाऊनमुळे दारूसाठी मद्यपींची मागणी लक्षात घेत चोरांनी त्यांना चढ्या भावात सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. त्यासाठी दारू दुकान फोडले. दारूची पन्नास रुपयांची क्वॉर्टर दोनशेला विकत घसघशीत ५० हजारांची कमाई केली. हा उद्योग एका अल्पवयीनाने केला हे विशेष! 

जवाहरनगर पोलिस ठाणे हद्दीत संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ प्रकाश मनुलाल जैस्वाल यांचे देशी दारूचे दुकान आहे. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने हे दारूचे दुकान बंदच होते. हीच संधी साधून चोरांनी देशी दारूचे दुकान फोडले.

तेथून सात दारूचे बॉक्स व सात बाटल्या लंपास केल्या. ही बाब सीसीटीव्हीचा ॲक्सिस असलेल्या जैस्वाल यांच्या मोबाईलवर दिसून आली. त्यानंतर याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. यानंतर उस्मानपुरा गुन्हे प्रगटीकरण शाखेचे प्रमुख कल्याण शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयितांचा शोध घेतला; तसेच देशी दारू दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही पाहणे केली. त्यावरून त्यांनी संशयितांची ओळख पटली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्‍याची कसून चौकशी केली असता त्याने आकाश ऊर्फ गयब्या राजू खरे, अक्षय ऊर्फ उऱ्या सुनील अहिरे, सागर अशोक पिंगळे यांच्यासोबत मिळून दारूचे दुकान फोडल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून दोन देशी दारूचे बॉक्स पोलिसांनी जप्त केले.

सर्व संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप तारे, गुन्ह प्रकटीकरण शाखेचे प्रमुख कल्याण शेळके, प्रल्हाद ठोंबरे, सतीश जाधव, संतोष सिरसाठ, संजय सिंह यांनी केली. 

लॉकडाऊनमध्ये ओले केले हात 
अल्पवयीन मुलाचे तीन साथीदार पसार आहेत. या मुलाने त्याच्या साथीदारासोबत सातपैकी पाच देशी दारूचे बॉक्स विकले. एक दारू बाटली साधारणतः पन्नास रुपयांना असताना लॉकडाऊनच्या काळात संधीत हात ओले करीत त्यांनी दारू बाटली चक्क दोनशे रुपयांना विकली. 

कोण आहे हा अल्पवयीन? 
अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. त्याने यापूर्वी तब्बल ३९ मोबाईल चोरी केले होते. त्यानेच इतर तिघांना हाताशी धरून प्रकाश जैस्वाल यांचे देशी दारूचे दुकान फोडले. 
 

 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auranagabad News A Drunken Boy In Custody