esakal | वैजापूर-श्रीरामपूर रस्त्यावर दोन दुचाकींचा भीषण अपघात, एक ठार तर आठवीतील दोन विद्यार्थी गंभीर जखमी

बोलून बातमी शोधा

Vaijapur Accident News}

हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांच्या समोरील बाजुचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

वैजापूर-श्रीरामपूर रस्त्यावर दोन दुचाकींचा भीषण अपघात, एक ठार तर आठवीतील दोन विद्यार्थी गंभीर जखमी
sakal_logo
By
भानुदास धामणे

वैजापूर (जि.औरंगाबाद) : दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार, तर २ शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना वैजापूर- श्रीरामपूर रस्त्यावरील लाडगाव शिवारातील बाबा हाॅटेलजवळ बुधवारी (ता.24) दुपारी दीड वाजेदरम्यान घडली. नारायण कुरकुटे (वय ४५, रा. नागमठाण, ता.वैजापूर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

वाचा - रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ


दुचाकी (एमएच २० ईआर ०८४८) आणि विनाक्रमांकाची दुचाकी या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. यात कुणाल विजय त्रिभुवन (रा.खंबाळा, वय १५) आणि इतर १ विद्यार्थी तसेच नारायण कुरकुटे असे तिघेजण गंभीर जखमी झाले होते. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांच्या समोरील बाजुचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

वाचा - Corona Updates: औरंगाबादेत २४० जणांना कोरोना, एक हजार १०५ रुग्णांवर उपचार सुरू

दरम्यान घटनेची माहिती मिळताच लाडगाव येथील प्रमोद सोमवंशी, राजू जाधव, विकास पाटील सोमवंशी, नितीन निंबाळकर, न्यू हायस्कूल शाळेचे लिपिक मगर, कर्मचारी खेमनर, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत सराला बेटाच्या रूग्णवाहिकेतुन जखमींना उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नारायण कुरकुटे यास तपासुन मृत घोषित केले तर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान अपघातातील दोन्ही अल्पवयीन मुलं ही न्यू हायस्कूल लाडगाव येथे आठवीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती विरगाव पोलिसांना देण्यात आली आहे.

संपादन - गणेश पिटेकर