esakal | IMP NEWS : जगप्रसिद्ध बजाज कंपनी दोन दिवस बंद, का ते वाचा सविस्तर..!
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

कोरोना साखळी तोडण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल बजाज कंपनीने उचलले आहेत. कंपनीतर्फे शनिवार व रविवारी (ता.२७ व २८) युनिट बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती बजाज आटो प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

IMP NEWS : जगप्रसिद्ध बजाज कंपनी दोन दिवस बंद, का ते वाचा सविस्तर..!

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : शहरात व वाळूज परिसरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. काही नामांकित कंपन्यामध्ये ही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ही साखळी तोडण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल बजाज कंपनीने उचलले आहेत. कंपनीतर्फे शनिवार व रविवारी (ता.२७ व २८) युनिट बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती बजाज आटो प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

शहरात व वाळूज परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे. रोज २०० नवीन रुग्ण वाढत आहे. यातच वाळूज परिसरातील नामांकित कंपन्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर एका नामांकित कंपनीचे दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण ७९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामुळे हा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी बजाज कंपनी ने दोन दिवस कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे  कंपनीचे उपमहाव्यवस्थापक मुकुंद बडवे यांनी सांगितले.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

२४ एप्रिल रोजी ८०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बजाज आटो दोन शिफ्टमध्ये सुरू झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जवळपास सर्वच वेंडरचेही काम सुरू झाले होते. आजच्या स्थितीत चिकलठाणा रेल्वे स्टेशन, वाळूज, शेंद्रा, पैठण एमआयडीसीतील  ९० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. बजाजचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर वाळूज एमआयडीसी मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर ही संख्या झपाट्याने वाढतच राहिली. ही साखळी तोडण्यासाठी बजाजने दोन दिवस शटडाऊन करण्याचा निर्णय घेतला.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

या दोन दिवसात बजाज कंपनी सॅनिटायझिंग व डिइन्फेक्शचे काम करण्यात येणार आहे. यास वाळूज महानगरातून येणार्‍या कामगारांना होम क्वारंटाईन करणे बंधनकारक केले आहेत. त्यांचे वय ५५ पेक्षा जास्त आहे व त्यांना मधुमेह व इतर आजार असलेल्यांना सुट्टी देण्यात आली आहेत. कंपनीत सद्यस्थिती तीन हजार पैकी केवळ १ हजार कामगारावर दोन शिफ्टमध्ये काम करण्यात येत आहेत.
दोन दिवस कंपनी शटडाऊन केल्यानंतर काय परिणाम होईल हे पाहून पुढील शट डाऊन वाढवायचा की नाही याचा निर्णय घेण्यात येईल, असेही बजाज प्रशासनाने सांगितले.