औरंगाबादेत आणखी 9 पॉझिटिव्ह, दिवसभरात 99 एकूण 477 रुग्ण 

Friday, 8 May 2020

शुक्रवारी (ता. 8) सकाळच्या सत्रात 18 जणांना कोविड विषाणूची  लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तेथील आणखी एक जवान बाधित झाला असे अहवालावरून स्पष्ट झाले. संजयनगर, मुकुंदवाडी येथील आठ जण पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे आता दिवसभरात रुग्णसंख्या 99 वर पोचली एकूण रुग्णसंख्या 477 झाली आहे.    

औरंगाबाद - हिंगोलीनंतर औरंगाबादेतील सातारा परिसरातील एसआरपीएफ कॅम्पमध्ये तब्बल 72 जवान पॉझिटिव्ह आले. त्यानंतर पुन्हा येथील एक आणि संजयनगर, मुकुंदवाडी येथील आठ  रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या 477 इतकी झाली. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सकाळ ला दिली. 

शुक्रवारी (ता. 8) सकाळच्या सत्रात 18 जणांना कोविड विषाणूची  लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तेथील आणखी एक जवान बाधित झाला असे अहवालावरून स्पष्ट झाले.

संजयनगर, मुकुंदवाडी येथील आठ जण पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे आता दिवसभरात रुग्णसंख्या 99 वर पोचली एकूण रुग्णसंख्या 477 झाली आहे.    

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबादच्या सातारा परिसरात राज्य राखीव पोलिस बलाचा कॅम्प आहे. या कॅम्पमधील मालेगावला गेलेल्या जवानाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पुन्हा येथे काही जवानांना लक्षणे दिसून येत होती.

त्यामुळे जवानांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी (ता. 7) गुरुवारी गेले होते  तेथे त्यांनी सुमारे 134 जणांच्या लाळेची चाचणी केली. तेव्हा 20 जणांना तपासणीदरम्यान घसा आणि खवखवीचा त्रास जाणवत होता असे डॉक्टरांनी सांगितले.

जवानांच्या लाळेच्या नमुन्यांचे सॅम्पल गोळा करुन ते घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठविले. एकूण 112 सॅम्पलपैकी 72 जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. 

मालेगाव कनेक्शन.. 
सातारा कॅम्पमध्ये मालेगावहून परत आलेल्या एका जवानाला लागण झाली होती. त्यानंतर आणखी काही जणांना लागण झाली. आता पुन्हा 72 जणांना लागण झाली असून ते मालेगाववरुन परतले होते. 

कोरोना मीटर 
उपचार घेत असलेले रुग्ण ः 435
बरे झालेले रुग्ण ः 30
मृत्यू झालेले रुग्ण ः 12

एकूण --------------------477

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Breaking News 9 More Positive Total 477