मराठवाड्यासाठी १०७ व्हेंटीलेटर खरेदीला मान्यता 

मनोज साखरे
Monday, 13 April 2020

मराठवाड्यात तपासणीसाठी आजपर्यंत एकूण नमुने २ हजार ३९१ नमूने घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी २ हजार ७९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून २८५ चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी २ हजार ४२ नमुने निगेटीव्ह आहेत. तर ३७ रुग्णांचे स्वॅब नमुने पॉझिटीव्ह आहेत. २८ नमूने मानांकानुसार नसल्‍याने परत करण्‍यात आले आहेत.

औरंगाबाद : कोरोना (को‍वीड-१९) उद्भवलेल्‍या आजारावर प्रतिबंध व उपचारासाठी मराठवाड्यासाठी १०७ व्‍हेंटीलेटर खरेदी करण्‍याबाबत शासनाकडून मान्‍यता मिळाली आहे. त्यामुळे मराठवाड्याला या संकटकाळात थोडासा आधार मिळणार आहे. औरंगाबाद विभागांतर्गत आठ जिल्ह्यांत एकूण ३७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. 

मराठवाड्यात तपासणीसाठी आजपर्यंत एकूण नमुने २ हजार ३९१ नमूने घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी २ हजार ७९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून २८५ चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी २ हजार ४२ नमुने निगेटीव्ह आहेत. तर ३७ रुग्णांचे स्वॅब नमुने पॉझिटीव्ह आहेत. २८ नमूने मानांकानुसार नसल्‍याने परत करण्‍यात आले आहेत.

आतापर्यंत एका रुग्‍णाला कोराना विषाणू संक्रमणातून बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सुटी देण्यात आली आहे. आठ जिल्ह्यात सध्‍या ३ हजार ८५ व्‍यक्‍तींना घरीच विलगीकरणात व ३६८ व्‍यक्‍तींना संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍यात आले आहे. तसेच ९८६ व्‍यक्‍तींना अलगीकरण कक्षात(Isolation ward) ठेवण्‍यात आले आहे.

विभागामध्‍ये आढळून आलेल्‍या कोरोना बाधीत रुग्‍णांच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्तिंचाही पाठपुरावा करण्‍यात येत असून आतापर्यंत अशा १ हजार २८५ व्‍यक्तिंना शोध घेण्‍यात आला आहे. त्यापैकी ४०८ लोकांचे स्‍वॅब नमुने घेण्‍यात आले असून त्यातील ११ नमुने पॉजिटिव्‍ह, ३०६ नमुने निगेटिव्‍ह अहवाल प्राप्‍त झाला आहे तसेच ९१ स्‍वॅबचे अहवाल प्रलंबित आहे. 

स्‍थलांतरितांसाठी २१८ मदत शिबीरे 
मजुरांसाठी विभागामध्‍ये सध्या २१८ मदत शिबीरे उभारण्‍यात आली आहेत. यात सध्‍या २० हजार ७२५ स्‍थलांतरीत मजुर वास्‍तव्‍यास आहेत. या मजुरांच्‍या जेवणाची, वैद्यकीय तपासणीची व इतर अनुषंगीक बाबींची व्यवस्था या शिबीरामध्ये करण्‍यात आलेली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा 

१०७ व्हेंटीलेटर खरेदीला मान्यता 
को‍वीड-१९ मुळे उद्भवलेल्‍या आजारावर प्रतिबंध व उपचारास्‍तव १०७ व्‍हेंटीलेटर खरेदी करण्‍याबाबत शासनाकडून मान्‍यता देण्‍यात आली आहे. 

यात जालना येथे दहा, नांदेड येथील शासकीय रुग्‍णालयासाठी दहा व वैद्यकीय महाविद्यालयासाठी पंधरा असे एकुण २५ तर हिंगोलीत आठ, बीडमध्ये वीस, लातूरमध्ये आठ व उस्‍मानाबादेत छत्तीस आणि उर्वरीत जिल्‍हयांकरीता खरेदी करण्‍यात येत आहे. 

मराठवाड्यातील रुग्ण 

  • औरंगाबाद - २४ ‍(त्‍यापैकी एकाणाचा मृत्‍यु, एक रुग्‍ण बरा झाला) 
  • जालना -०१ 
  • हिंगोली - ०१ 
  • लातूर - ०८ 
  • उस्‍मानाबादे -०३ 
  • बीड - ०१ (आष्‍टी येथील या एका रुग्‍णावर नगर येथे उपचार) 
     

 औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Breaking News Approval To Purchase १०७ Ventilators For Marathwada