माझी पत्नी कधीही जग सोडेल म्हणत त्याने केलं तिच्याशी असं की झालं तसं!

Rape on a woman
Rape on a woman

औरंगाबाद : एका शासकीय कार्यालयात छोटी-मोठी कामे करून उपजीविका भागवणाऱ्या महिलेला लग्न करण्याचे आमिष व मुलींना सांभाळण्याचा विश्‍वास देत नगर भूमापक कार्यालयातील भूमापक परिरक्षण अधिकाऱ्याने अत्याचार केला. याप्रकरणी संशयित अधिकाऱ्याविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात बलात्काराच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अनिल गणपत रूपेकर असे संशयित अधिकाऱ्‍याचे नाव आहे. या प्रकरणात ३८ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली. पीडिता शासकीय कार्यालयात कामे करून उपजीविका भागवते. महिलेचा पती दहा वर्षांपासून बेपत्ता आहे.

जून २०१६ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे पीडित महिला काम करीत असताना तिची ओळख रूपेकर सोबत झाली. त्यावेळी अनिल जालना येथे कार्यरत होता. काही दिवसांनंतर रूपेकर याची औरंगाबादेत भूमापन कार्यालयात बदली झाली. त्यावेळी रूपेकर महिलेला त्यांच्या कार्यालयात छोटी-मोठी कामे देत होता. यातून त्यांच्यात मैत्री झाली.

ते एकमेकांना कौटुंबिक बाबी शेअर करीत होते. आपली पत्नी खूप आजारी आहे, ती कधी जग सोडून जाईल हे सांगता येत नाही, ही बाब अनिलने सांगत पीडित महिलेला तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. पीडित महिलेनेही पती दहा वर्षांपासून सोडून गेल्याचे सांगितल्यामुळे एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पीडित महिलेच्या दोन्ही मुलीचे शिक्षण व लग्न करण्याची हमी रूपेकर याने दिली. त्यामुळे पीडित महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर दोघांचे भेटणे, बोलले सुरू होते. २५ डिसेंबर २०१६ ला अनिल रूपेकर महिलेच्या घरी आला. आजारी पत्नी कधीही जग सोडून जाईल असे सांगत त्याने महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली; मात्र महिलेने त्याला स्पष्ट नकार दिला; परंतु आपण लग्नच करणार आहोत असे म्हणत महिलेचे त्याने लैंगिक शोषण केले.

त्यानंतर अनेक वेळा त्याने महिलेचे लैंगिक शोषण केले. महिलेने लग्नाबाबत विचारल्यानंतर तो टाळाटाळ करीत होता. महिलेने लग्नासाठी आग्रह धरल्यानंतर तीन फेब्रुवारीला रात्री त्याने आठच्या सुमारास क्रांतीनगर येथे बोलावून महिलला शिवीगाळ केली व मारहाण करून लग्न करणार नसल्याचे सांगितले.

दिली जिवंत जाळण्याची धमकी 
महिलेने लग्नासाठी आग्रह धरल्यानंतर संशयिताने तिला शिवीगाळ व मारहाण केली; तसेच पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकी दिली. याविरोधात महिलेने वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. 

हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा 
महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या मुलींचा सांभाळ करण्याची हमी संशयिताने दिली; मात्र त्याने अत्याचार केला. या प्रकरणात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com