esakal | औरंगाबादेतील सातारा डोंगराला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग शमविण्याचे प्रयत्न सुरु  
sakal

बोलून बातमी शोधा

Satar Mountain Catch Fire In Aurangabad News

 डोंगराला आग लागल्यामुळे दुरूनच आगीचे लोळ उठतांना दिसून येत होते.

औरंगाबादेतील सातारा डोंगराला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग शमविण्याचे प्रयत्न सुरु  

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : सातारा डोंगराला चारही बाजूंनी भीषण आग लागल्याची घटना बुधवारी (ता.दहा) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. रात्री आगीचे लोळ सुरु झाल्याने भीषण रुप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच पदमपूरा येथील अग्‍निशमन दलाचे तीन बंब आणि २१ जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याची माहिती अग्‍निशमन दलाचे मोहन मुंगसे यांनी दिली. 

' सर...मास्कमुळे जीव गुदमरतोय...सर, दोरीमुळे कान दुखू लागलाय...'


डोंगराला आग लागल्यामुळे दुरूनच आगीचे लोळ उठतांना दिसून येत होते. बीड बायपास रोडपासून जवळच असलेल्या सातारा परिसरातील डोंगरावरील गवताला बुधवारी दुपारी अचानकपणे आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत डोंगरावरील गवताला आपल्या कावेत घेतले होते. मात्र आग इतकी भीषण होती की, वाल्मी, आपत भालगाव आणि साताऱ्‍याच्या डोंगरापर्यंत पसरली. डोंगराला आग लागल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

आगीची माहिती मिळताच दुपारी चार वाजता पदमपूरा येथील अग्निशमन दलाच्या तीन बंबासह २१ जवानांनी घटनास्थळी धाव घेवून रात्री उशिरापर्यंत डोंगराच्या गवताला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अंधार असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविताना अडचणी येत होत्या. कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याची माहिती मुंगसे यांनी दिली. 

संपादन - गणेश पिटेकर