esakal | Corona Update : औरंगाबादेत दिवसभरात ३०६ पॉझिटिव्ह; पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

औरंगाबाद जिल्ह्यात आज १६८ जणांना (मनपा ३५, ग्रामीण १३३) सुटी देण्यात आली.

Corona Update : औरंगाबादेत दिवसभरात ३०६ पॉझिटिव्ह; पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू 

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : आज एकूण ३०६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजार ५६५ झाली आहे. आजपर्यंत एकूण ५८१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता ४ हजार ३४२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश 
औरंगाबाद जिल्ह्यात आज १६८ जणांना (मनपा ३५, ग्रामीण १३३) सुटी देण्यात आली. आजपर्यंत १३,६४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी (ता.१५) सकाळच्या सत्रात १५१ रुग्णांची भर पडली होती. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत १५५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३५, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास २१ आणि ग्रामीण भागात ७४ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

ग्रामीण (९०)
औरंगाबाद (१३), फुलंब्री (१), गंगापूर (७), कन्नड (२), सिल्लोड (१२), वैजापूर (१) पैठण (३६), सोयगाव (४), गंगापूर उपजिल्हा रुग्णालय (२), भेंडाळा, गंगापूर (१), एसबी शाळा परिसर, गंगापूर (१), सलामपूर, वडगाव (१), फुले नगर, पंढरपूर (१), लाडसावंगी (१), नांदराबाद, गंगापूर (१), आंबेगाव, गंगापूर (१), लाडगाव (५) 

महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड  

सिटी एंट्री पॉइंट (३५)
जळगाव (१), एन नऊ (१), फुलंब्री (४), बीड बायपास (१), स्वामी विवेकानंद नगर (१),  हर्सुल (१),  राम नगर (१), एन दोन (४), सातारा परिसर (२), सोयगाव (१), गणोरी (१), एन बारा (१), गंगापूर (२), पडेगाव (२), शिवाजी नगर (५), सिल्लोड (१), नंदनवन कॉलनी (२), रांजणगाव (३), अन्य (१),

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

मनपा (०९)
एनआरएच हॉस्टेल (१), एन पाच  सिडको (१), एन दोन सिडको, म्हाडा कॉलनी (१), घाटी परिसर (१), गारखेडा (१), युनायटेड सिग्मा हॉस्पीटल परिसर (१), अन्य (३)

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू 
घाटी रुग्णालयात सिडको एन नऊ येथील २८ वर्षीय महिलेचा, हर्सुल येथील १४ वर्षीय मुलीचा, छावणीतील (७९) वर्षीय महिलेचा व संभाजी कॉलनी सिडकोतील ६५ वर्षीय पुरुषाचा आणि खासगी रुग्णालयात ५२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

(संपादन - प्रताप अवचार)