Corona-Virus : औरंगाबादेत आज ४९ रुग्ण पॉझिटिव्ह, तीन कोरोनाबधितांचा मृत्यू

मनोज साखरे
Thursday, 6 August 2020

  • एकूण कोरोनाबधित रुग्ण- १५ हजार ५४० 
  • बरे झालेले रुग्ण -११ हजार ५२१ 
  • मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - ५०३
  •  उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या- ३ हजार ५१६

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता.६) ४९ रुग्णांचे अहवाल सकाळच्या सत्रात पॉझिटिव्ह आले आहेत. आज शहरातील खासगी रूग्णालयात तीन कोरोनाबधितांचा मृत्यू झाला. तर जिल्ह्यात एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १५ हजार ५४० एवढी झाली. यातील ११ हजार ५२१ बरे झाले असून ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ५१६ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा...  

शहरातील बाधीत (३८ रुग्ण)

एन सहा सिडको (१), बन्सीलाल नगर (१), क्रांती नगर (४), मिलिट्री हॉस्पीटल, छावणी (१), सिडको एन पाच, श्री नगर (१), शहानूरमियाँ दर्गा परिसर (१), प्रकाश नगर (३), समृद्धी नगर,एन चार सिडको (१), मुकुंदवाडी (१), औरंगपुरा (२), संभाजी कॉलनी,एन सहा सिडको (१), संतोषीमाता मंदिर, मुकुंदवाडी (१), मल्हार चौक, गारखेडा (१), कांचनवाडी (१), शिवशंकर कॉलनी (२), बालाजी नगर (१), जे सेक्टर, मुकुंदवाडी (१), शिवनेरी कॉलनी (१), विष्णू नगर, आकाशवाणी (१), न्यू विशाल नगर, गजानन मंदिर परिसर (१), एस टी कॉलनी, फाजिलपुरा (१), एन नऊ, पवन नगर (२), मातोश्री नगर, पुंडलिक नगर (१), सातारा पोलिस स्टेशन परिसर (१), नागेश्वरवाडी (१), राजा बाजार (१), कर्णपुरा, छावणी परिसर (१), अहिल्याबाई होळकर चौक, पद्मपुरा (२), अन्य (१) 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

ग्रामीण भागातील बाधीत (११ रुग्ण) 

बाजार गल्ली, अब्दीमंडी (१), आयोध्या नगर, बजाज नगर (२), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (३), जय हिंद चौक, बजाज नगर (१), गणेश सो., आंबेडकर चौक, बजाज नगर (१), शफेपूर, कन्नड (१), पिंप्री राजा (१), सारंगपूर, गंगापूर (१)   

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
खासगी रुग्णालयातील एन बारा हडकोतील ५२ वर्षीय पुरूष आणि जाधववाडीतील ४९ पुरुषांचा मृत्यू झाला तसेच अरिहंत नगरातील ६१ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Edit By Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 49 positive increase and three patient death