esakal | औरंगाबादेत कोरोनाचा नववा बळी, नूर कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

नूर कॉलनीतील या महिलेला आजच सकाळी गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण बायलॅट्रल न्युमोनिया डयु टु कोव्हीड - १९ इन केस ऑफ डायबिटीस मेलआयटस विथ हायपरटेन्शन विथ हायपोथायरॉयडिझम असे नोंदवण्यात आले आहे.

औरंगाबादेत कोरोनाचा नववा बळी, नूर कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : शहरात कोविड -19 विषाणूचे संकट आणखी गडद होतानाच कोरोनामुळे नववा बळी गेला आहे. गुरुदत्तनगर, गारखेडा परिसरात राहणाऱ्या ४७ वर्षीय रुग्णाचा काल मृत्यू झाला असतानाच आज शनिवारी (ता. २) परत नूर कॉलनीतील एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झल्याची माहिती घाटी रुग्णालयाचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 

महत्त्वाची बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या

नूर कॉलनीतील या महिलेला आजच सकाळी गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण बायलॅट्रल न्युमोनिया डयु टु कोव्हीड - १९ इन केस ऑफ डायबिटीस मेलआयटस विथ हायपरटेन्शन विथ हायपोथायरॉयडिझम असे नोंदवण्यात आले आहे.

परभणीतून फोन आला आणि औरंगाबादेत घडले काय...  

मृत्युपश्चात त्यांचा स्वॅब घेण्यात आलेला होता, पण त्याचा अहवाल प्रतिक्षेत होता. सायंकाळी हा अहवाल प्राप्त झाला असून तो कोव्हीड - १९ पॉजीटीव्ह आला आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

आतापर्यंत झालेले मृत्यू 

५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू 
१४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू 
१८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू 
२१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू 
२२ एप्रिलला हिलाल कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू. 
२७ एप्रिलला किलेअर्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू 
२८ एप्रिललाही किलेअर्क येथील ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू 
१ मे गुरुदत्तनगर, गारखेडा येथील ४७ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू. 
आणि
२ मे नूर कॉलनी येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू