Corona Update : औरंगाबादेत ३२ कोरोना रुग्णांची वाढ, दोन जणांचा मृत्यू 

प्रकाश बनकर
Thursday, 28 January 2021

आतापर्यंत एकूण १ हजार २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने सांगितले.

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.२७) ४२ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४५ हजार ५१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात ३२ रुग्णांची नव्याने भर पडली. तर एकूण कोरोनाबाधितरुग्णांची संख्या ४६ हजार ८४८ झाली आहे. आतापर्यंत एकूण १ हजार २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने सांगितले. 

नवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले!!! 

महापालिका हद्दीत हर्सूल, सावंगी (१), देवळाई रोड, परिसर (१), नारळीबाग (१),ए २ सिडको (१), हनुमान नगर (१), समर्थ नगर (२), मिटमिटा (३), बीड बायपास रोड परिसर (२), निराला बाजार (२), अन्य (१०) असे २४ रुग्ण वाढले आहेत. तर ग्रामीण भागात ८ रुग्ण वाढले आहेत. 

न थांबता सलग चोवीस तास सादर केली मराठमोळी लावणी, लातूरच्या कन्येने रचला इतिहास

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू 
शहरातील खासगी रुग्णालयात खोकडपुऱ्यातील ६७ व शाहनूरवाडीतील ७८ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

कोरोना मीटर 
बरे झालेले  : ४५,५१० 
मृत्यू : १,२३५ 
उपचार सुरु : १०३ 
एकूण : ४६,८४८ 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update Covid 32 Cases Reported, Two Died Marathi News