CORONA BREAKING : औरंगाबादेत चोवीस तासात पाच जनांचा कोरोनाने मृत्यू ,

मनोज साखरे
Thursday, 9 July 2020

आतापर्यंत एकूण ७ हजार ५०४ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ४ हजार ३३ रुग्ण बरे झालेले आहेत. एकूण ३३५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३ हजार १४१ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

औरंगाबाद : औरंगाबादेत मागील चोवीस तासात पाच जनांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या पाच मृत्यूमध्ये दोन औरंगाबाद ग्रामीण क्षेत्रातले असून औरंगाबाद शहरातील तीन जनांचा मृत्यूत समावेश आहे. पाचही रुग्णांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

यांचा मृत्यूत समावेश : 

१) कराडी मोहल्ला,  पैठण : ५६ वर्षीय पुरुष , ०७ जुलै रोजी घाटी रुग्णालयात दाखल, बुधवारी ता.८ रोजी दुपारी ३.४५ ला मृत्यू, कोरोना आणि हायपरटेन्शन असे मृत्यूचे कारण आहे. 

२) गणेश कॉलनी गल्ली नंबर चार : ८० वर्षीय महिला , २६ जून रोजी घाटीत दाखल झाली, २७ जून ला अहवाल पॉझिटिव्ह आला, उपचारादरम्यान बुधवारी ता.८ रोजी रात्री ११.३० वाजता मृत्यू झाला. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

३) सिल्लेखाना क्रांती चौक : ४२ वर्षीय पुरुष , ३० जून रोजी घाटीत दाखल, ३० जूनला अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. उपचारदरम्यान ०९ जुलै रोजी पहाटे ३ वाजता मृत्यू झाला. 

४) अरिश कॉलनी औरंगाबाद : ७४ वर्षीय पुरुष : ३० जून रोजी घाटीत दाखल, १ जुलै रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला. ०९ जुलैच्या पहाटे २.४५ वाजता कोरोनाचा मृत्यू झाला. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

५) देवगाव रंगारी , कन्नड : ५५ वर्षीय पुरुष , ०७ जुलै रोजी घाटीत दाखल, ०९ जुलै रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तत्पूर्वी बुधवारी  सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली   

 

एकूण ३३५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू 

औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात असून आज (ता. ९)  जिल्ह्यात सकाळच्या सत्रातच १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात औरंगाबाद महापालिका  हद्दीतील १०१ व ग्रामीण भागातील ६५ रुग्णांचा समावेश आहे.

आज अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यात ९० पुरूष व ७६ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७ हजार ५०४ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ४ हजार ३३ रुग्ण बरे झालेले आहेत. एकूण ३३५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३ हजार १४१ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

संपादन : प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona update five more corona death in ghati hospital