esakal | Corona : औरंगाबादेत चोवीस तासात पाच जणांचा कोरोनाने मृत्यू,आतापर्यंत ३९० जणांचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दहा हजाराचा टप्पा पार झाला आहे. याच बरोबर कोरोनामुळे मृत्यची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. गेल्या चोवीस तासात खाजगी रुग्णालयात दोन, तर घाटी रुग्णालयात तीन असे पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९० जणांचा  कोरोनामुळे बळी गेला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. 

Corona : औरंगाबादेत चोवीस तासात पाच जणांचा कोरोनाने मृत्यू,आतापर्यंत ३९० जणांचा बळी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दहा हजाराचा टप्पा पार झाला आहे. याच बरोबर कोरोनामुळे मृत्यची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. गेल्या चोवीस तासात खाजगी रुग्णालयात दोन, तर घाटी रुग्णालयात तीन असे पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९० जणांचा  कोरोनामुळे बळी गेला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयाच्या अधिष्ठातातर्फे देण्यात आली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
शनिवारी (ता.१८) जिल्ह्यात सकाळी ८४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण  बाधितांची संख्या  १० हजार १६६ वर पोहोचली आहे. , त्यापैकी ५८६१ बरे झाले, ३९० जणांचा मृत्यू झाला. तर ३९१८ जणांवर उपचार सुरु आहेत. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शहरातील खासगी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील ६२ वर्षीय व जाधवमंडी राजा बाजारातील ६० वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर घाटी रुग्णालयात चिकलठाणा येथील चाळीस वर्षे रुग्णास शुक्रवारी (ता.१७) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्याच दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. व सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हर्सूल सावंगी येथील ६६ वर्षे पुरुष रुग्णास नऊ जुलैला घाटीत दाखल करण्यात आले होते. दहा तारखेला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर  शुक्रवारी (ता.१७) त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. किल्लेअर्क, भोईवाडा येथील ६२ वर्षीय महिलेला आठ जुलैला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज पर्यंत घाटी रुग्णालयात कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या २९७ वर गेली आहे, असे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

कोरोना मीटर

  • बरे झालेले-५८६१
  • उपचार सुरू -३९१८
  • मृत्यू------३९०
  • एकूण रुग्ण- १०१६६

(संपादन : प्रताप अवचार)