औरंगाबादेतून बाराशे मजुर आपल्या गावी आज होणार रवाना 

lockdown.jpg
lockdown.jpg

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे दीड महिन्यांपासून औरंगाबाद जिल्ह्यात परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील २३२७ मजूर अडकून पडले असून, यामध्ये सर्वाधिक मजूर झारखंड, मध्यप्रदेश तसेच बिहार राज्यातील आहेत. यातील भोपाळला लागून असलेल्या २६ जिल्ह्यातील मजुरांचा पास तयार झालेला आहे. गुरुवारी (ता. सात) सायंकाळी पाच वाजता या मजुरांना रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठविले जाणार आहे. या संदर्भात रेल्वे विभागाला बाराशे मजुरांच्या याद्याही पाठविल्या असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. जिल्ह्यात विविध प्रकल्पांवर काम करण्यासाठी परराज्यातील आलेले मजूर यामुळे जिल्ह्यातच अडकून पडले. जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ४५ मदत छावणीमध्ये राज्यातील तसेच परराज्यातील ९ हजार ५४२ विस्तारित कामगार, निराश्रित व्यक्ती, प्रवासादरम्यान अडकलेल्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये मजुरांची संख्या मोठी असून यातील २ हजार १४६ मजूर गावी जाण्यासाठी इच्छुक आहेत.

यामध्ये झारखंडामधील सर्वाधिक ६३८ मजूर असून मध्यप्रदेश मधील ५६५, उत्तर प्रदेशामधील २९४, पश्चिम बंगालमधील १२५, राजस्थानमधील १९५, ओडीसा व नेपाळ राज्यातील ११२, बिहार मधील १५८ तसेच इतर राज्यातील मजुरांनिशी आपल्याला घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रिलीफ कॅम्पमध्ये महाराष्ट्र राज्यातील १८० मजूर घरी जाण्यासाठी इच्छुक असून यामध्ये सर्वाधिक ३७ मजूर हिंगोली जिल्ह्यातील आहेत तर जालना जिल्ह्यातील २४, अकोला १०, वाशिम १४, सांगली १२, जळगाव जिल्ह्यातील २६ असे एकूण १८० मजूर घरी जाण्यासाठी इच्छुक आहेत. यातील बहुतेक जणांची वैद्यकीय तपासणी झाली असून, केवळ ज्या जिल्ह्यात जायचे आहे, तेथील प्रशासनाची परवानगी आदी बाबी पूर्ण झाल्यानंतर या मजूरांना घरी जाता येणार आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

दरम्यान राज्याच्या रेडझोनमधून येणाऱ्या सर्व नागरीकांना उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्यांनी थेट मज्जाव केला आहे. काही राज्यांनी अद्याप मजूरांना राज्यात येऊ देण्यासाठी कोणताही स्पष्ट निर्णय घेतला नाही तर इतर राज्यांसोबतही ना हरकतीसाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, त्यांच्याकडून ना हरकत प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील बीड आणि परभणी सारख्या जिल्ह्यांनीही रेडझोन असलेल्या जिल्ह्यामधून येणारे मजूर तसेच कोणत्याही प्रवाशाला जिल्ह्यात प्रवेश देण्यासाठी अटी घातल्या आहेत.

यामुळे औरंगाबाद जिल्हाप्रशासनाला या लोकांना घरी पाठवण्यासाठी अडचणी येत आहेत. तर याउलट गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश सारख्या राज्यांनी आपल्या लोकांना राज्यात घेण्यासाठी महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाप्रशासनाला पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, गुरुवारी औरंगाबाद येथून भोपाळ येथे आज सायंकाळी रेल्वे सोडण्यात येत आहे. याव्दारे बाराशे मजुर आपापल्या गावी रवाना होतील. उर्वरित मजुरांना आपल्या गावी पाठविण्याची लवकरच सोय केली जाणार आहे. तशी तयारी केली जात आहे. 
 

सायंकाळी पाच वाजता विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. रेल्वेसंबधी सेवा फक्त आमची असेल. मजुर, कामगारांचे फिटनेस प्रमाणपत्र तपासणीचे काम पोलिस व जिल्हा प्रशासन करणार आहे. 
अशोक निकम, स्टेशन अधिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com