esakal | भयंकर : औरंगाबादच्या ग्रामीण भागातही घुसला कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

आता औरंगाबादची कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण ५३ वर गेली असून, यात पाच जणांचा मृत्यू, तर २२ जणांना सुटी झाली आहे. सध्या घाटी रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात एकुण २६ जणांवर उपचार सुरु आहेत.

भयंकर : औरंगाबादच्या ग्रामीण भागातही घुसला कोरोना

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : कोरोना विषाणू आणि त्यापासून होणाऱ्या कोविड-१९ या आजाराचा धोका औरंगाबाद शहरात वाढत आहे. रविवारी (ता. २६) सकाळी दोन महिलांना कोरोनाची लागण  झाल्याचे स्पष्ट झाले असतानाच, सायंकाळी पुन्हा दोन महिलांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. 

आता औरंगाबादची कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण ५३ वर गेली असून, यात पाच जणांचा मृत्यू, तर २२ जणांना सुटी झाली आहे. सध्या घाटी रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात एकुण २६ जणांवर उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

औरंगाबादेत रविवारी सकाळी आसेफिया कॉलनीतील ३५ वर्षीय महिला आणि समतानगर येथील ६५ वर्षीय जेष्ठ महिलेचा कोवीड-१९ चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर सायंकाळी दौलताबाद येथील ५३ वर्षीय महिला आणि आसेफिया कॉलनी येथील ३९ वर्षीय महिलेचा कोवीड - १९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

आसेफिया कॉलनीतील महिला अगोदर एका रुग्णाच्या संपर्कातील आहे; परंतु दौलताबाद येथील महिलेचा संपर्क अजून समोर आला नाही. या महिलेला दमा, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर ती रुग्णालयात भरती झाली. या महिलांवर उपचार सुरु आहेत.

ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला

घाटी रुग्णालय सातपर्यंतचे अपडेट

मागील २४ तासात दुपारी चार वाजेपर्यंत १३ रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी ७ जणांचे स्वॅब घेण्यात आले. या सात रुग्णांचे व मागील तीन रुग्ण असे एकूण १० रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहेत. सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्ण चार आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या रुग्णांमध्ये ६० वर्षीय महिला रुग्ण (रा. किलेअर्क), ७० वर्षीय पुरूष रुग्ण (रा. टाऊन हॉल ),  समता नगरातील ३८ आणि ५१ वर्षीय कोविड पॉझिटिव्ह पुरूष यांचा समावेश आहे. सध्या घाटी रुग्णालयात एकूण २४ रुग्ण भरती आहेत.

go to top