औरंगाबादेत ७१ जण कोरोनाबाधित, सध्या २७९ रुग्णांवर उपचार सुरू

मनोज साखरे
Friday, 12 February 2021

. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ५२९ झाली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १२) ७१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ५२९ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २४३ जणांचा मृत्यू झाला. सध्या २७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ५२ जणांना सुटी झाली. यात शहरातील ४२ व ग्रामीण भागातील बाधित १० जणांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ४६ हजार ७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

पती-पत्नीचा वेदनादायी एक्झिट, लग्न सोहळा आटोपून घरी परताना...

शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : देवगिरी इंजिनिअरिंग महाविद्यालय (२), वेदांत नगर (१), उस्मानपूरा (२), सिडको एन-४ (७),बीड बायपास (३),एन-११ हडको (१), एन-३ सिडको (२), बेगमपुरा (१), हनुमान टेकडी (१), कमलनयन बजाज हॉस्पीटल, मुलींचे वसतीगृह (१), सातारा परिसर (१), पी.डब्ल्यू.डी. कॉलनी (१), क्रांती चौक (१), जटवाडा रोड (१), न्यू हनुमान नगर, गारखेडा (१), चिकलठाना (१), जय भवानी नगर (३), एस.बी.आय झोनल ऑफिस (१), पी. ई.एस. कॉलेज (२), करमाड (२), टी.व्ही सेंटर (१), एन-२ सिडको (१), श्रेय नगर (२), उस्मानपुरा (१), विटखेडा (१), म्हाडा कॉलनी (२), अन्य (२२) 

ग्रामीण भागातील बाधित : लासूर स्टेशन, गंगापूर (१), अन्य (०५) 

कोरोना मीटर 
-- 
बरे झालेले रुग्ण - ४६००७ 
उपचार घेणारे रुग्ण - २७९ 
एकुण मृत्यू - १२४३ 
--- 
आतापर्यंतचे बाधित - ४७५२९ 
---

 

संपादन - गणेश पिटेकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Updates Covid 71 Cases Reported