Corona : औरंगाबादेत 120 पॉझिटिव्ह, आज वाढले 11 रुग्ण

मनोज साखरे
Wednesday, 29 April 2020

शहरातील 9 जण नूर कॉलनी, गारखेडा येथील 1, भीमनगर 1 येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. सोमवारी एकाच दिवशी 29 जण, तर मंगळवारी 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर औरंगाबाद हादरले आहे. 

औरंगाबाद : शहरात मंगळवारी (ता. 28) 27 जणांना लागण झाल्यानंतर बुधवारी (ता. 29) आणखी 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. तीन दिवसात मिळून 67 रुग्ण आढळले असून, आता एकूण रुग्णसंख्या 120 झाली आहेत. त्यामुळे आता औरंगाबादचा प्रवास हॉटस्पॉटच्या दिशेने होत आहे.

शहरातील 9 जण नूर कॉलनी, गारखेडा येथील 1, भीमनगर 1 येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. सोमवारी एकाच दिवशी 29 जण, तर मंगळवारी 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर औरंगाबाद हादरले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

कोरोना बाधितांमध्ये संजयनगर, मुकुंदवाडी येथील 2, किलेअर्क येथील 1, पैठणगेट येथील 4, भीमनगर येथील 1, बडा तकिया मशीद सिल्लेखाना येथील 1 रुग्ण अगोदरच आहेत. 15 मार्च ते 26 एप्रिल या दरम्यान रुग्णसंख्या पन्नासच्या वर गेली होती. मात्र तीननच दिवसांची रुग्ण संख्या 67 झाली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे.

उपचार घेत असलेले रुग्ण - 90
------------------------------------------
बरे झालेले रुग्ण               - 23
------------------------------------------
मृत्यू झालेले रुग्ण             - 07
------------------------------------------
एकूण                             - 120
------------------------------------------

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Updates Now 120 Patients In Total