Corona : औरंगाबादचा आकडा 151 वर, आणखी 7 पॉझिटिव्ह

मनोज साखरे
Thursday, 30 April 2020

सोमवारी एकाच दिवशी 29 जण, तर मंगळवारी 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बुधवारी 21, तर गुरुवारी पहाटेच 14 व 7 नवीन रुग्ण वाढल्याने सर्व मिळून एकूण रुग्ण संख्या 151 झाली आहे.

औरंगाबाद : शहरात कोरोनाची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंत (ता. 29) 130 जणांना कोरोनाची लागण झाली. गुरुवारी (ता. 30) आणखी 14 जणांना, तर दुपारच्या सत्रात 7 जणांना लागण झाल्याचे कोविड -19 चाचणी अहवालातून स्पष्ट झाले. आता औरंगाबादेतील रुग्णांचा आकडा वाढून 151 वर पोचला आहे, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

घाटीतील लॅबमधून गुरुवारी पहाटे 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात 7 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात 4 किलेअर्क,  2 नूर कॉलनी आणि 1 भीमनगर येथील रुग्णांचा समावेश आहे. चार दिवसात मिळून 98 रुग्ण आढळले. त्यामुळे औरंगाबादकरांना अधिक सजग राहून काळजी घ्यावी लागणार आहे.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

गुरुवारी सकाळी जयभीम नगर येथील 6, किलेअर्क येथील 1, आसेफिया कॉलनीतील 2, नूर कॉलनीतील 1, कैलासनगर येथील 1, चिकलठाणा येथील 1,  घाटी रुग्णालय येथील 1 आणि अन्य ठिकाणचा 1 अशा 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

सोमवारी एकाच दिवशी 29 जण, तर मंगळवारी 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बुधवारी 21, तर गुरुवारी पहाटेच 14 व 7 नवीन रुग्ण वाढल्याने सर्व मिळून एकूण रुग्ण संख्या 151 झाली आहे.

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

उपचार घेत असलेले रुग्ण -151
बरे झालेले रुग्ण               - 23
मृत्यू झालेले रुग्ण             - 07
एकूण                             -151


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Updates Now 151 Patients In Total