esakal | औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर, तोकडीच आगविरोधी उपकरणे
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

मोठा गाजावाजा करुन शासनाने औरंगाबदकरांच्या सेवेत तीन वर्षांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले.

औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर, तोकडीच आगविरोधी उपकरणे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : भंडाऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केअर युनीटमध्ये आग लागल्यामुळे दहा नवजात लेकरांचा बळी गेला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला. दुसरी गंभीर बाब म्हणजे, औरंगाबादेतील जिल्हा सामान्य रुग्णालयातही आगविरोधी यंत्रणा अपुरीच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णालयाचे उद्घघाटनापूर्वी फायर ऑडीट झाले. त्यानंतर मात्र तोकडीच आगविरोधी उपकरणने तेथे असून भंडारासारखी घटना टाळण्यासाठी अजूनही येथे सक्षम उपकरणे नाहीत.

अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरले, विनायक मेटेंचा घणाघाती आरोप


मोठा गाजावाजा करुन शासनाने औरंगाबदकरांच्या सेवेत तीन वर्षांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले. लोकार्पणापूर्वी रुग्णालयाच्या इमारतीचे ‘फायर ऑडीट’ करणे आवश्‍यक असते. ते ‘ऑडीट’ महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून करण्यात आले. त्यानंतर इमारतीत वैद्यकीय सेवेसाठी हिरवा कंदील देण्यात आला होता. मात्र यानंतर उर्वरीत आगविरोधी साधने, उपकरणांसाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठविण्यात आला होता.

माझ्यावर औरंगाबाद रेल्वेस्थानकात तिघांनी अत्याचार केला, अल्पवयीन मुलीची पोलिसांकडे तक्रार


ही उपकरणे अद्यापही नाहीत!
गंभीर बाब म्हणजे औरंगाबादेतील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत फायर ऑडीट झाले तेव्हा आग विरोधी साधने अपुरी होती. त्यात फायर स्प्रिंकलर, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर ओझरिल आदी बाबी नाही.

शासनाकडे प्रस्ताव धुळखात
सुत्रांनी माहिती दिली की, जिल्हा रुग्णालयात उद्‍घाटनापूर्वी अर्थात तीन वर्षांपूर्वी अग्निशामक विभागाने फायर ऑडीट केले. त्यात उपकरणे नसून अर्धवट आगविरोधी साधने असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला. त्यानंतर बांधकाम विभागाने एक प्रस्ताव तयार करुन तो जिल्हा रुग्णालयामार्फत शासनाकडे दिला. परंतू, हा प्रस्ताव दोन वर्षे झाले तरीही अद्यापही धुळखात असून यावर शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

औरंगाबादच्या बातम्या वाचा


अग्निशामक विभागाने दिल्या वेळोवेळी नोटीस
अग्निशामक विभागाने या रुग्णालयाला दर सहा महिने व एक वर्षाला नोटीस दिल्या आहेत. नोटीसीवर नोटीस देऊनही साधनांचे व सुरक्षेचे घोडे अद्यापही पुढे सरकलेले नाही.


तूर्तास कोणताही निधी खर्च करायचा नाही, प्रथम प्राधान्य कोविडला द्यायचे, असा शासनाने एक अध्यादेश काढला त्यामुळे आपलेही प्रस्तावित कार्य थांबले आहे. कोविड संसर्गमुक्त झाल्यानंतर सर्व बाबी सुरळीत होतील.
-सुंदर कुलकर्णी, जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद.
 

संपादन - गणेश पिटेकर