कोरोना..डरोना.. मोबाईल व्हिडिओकॉन्फ्रन्सवर शेतकऱ्यांचा द्वादश मेळावा 

औरंगाबाद : कोरोनामुळे शेतीतज्ञांनी मोबाईलवरून व्हिडिओकॉन्फ्रन्सद्वारे थेट शेतातल्या शेतकऱ्यांना फळपिकाविषयी मार्गदर्शन केले.
औरंगाबाद : कोरोनामुळे शेतीतज्ञांनी मोबाईलवरून व्हिडिओकॉन्फ्रन्सद्वारे थेट शेतातल्या शेतकऱ्यांना फळपिकाविषयी मार्गदर्शन केले.

औरंगाबाद, ता. २३ : कोरोना प्रादुर्भावामुळे ॲग्रो इंडिया गटशेती संघाचा नियोजित १८० वा द्वादस कार्यक्रम शेतीत जाऊन शिवारफेरी करून झाला नाही; मात्र हा द्वादश मेळावा  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये २८ ते ३० शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन संवाद साधला. 

डॉ. भगवानराव कापसे यांनी निमंत्रित अतिथी व तज्ज्ञांच्या सहाय्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पाडली. शरद सवडे, रतन पवार या शेतकऱ्यांनी दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती घेऊन अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे नियोजन केले. संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात तर तज्ज्ञ दुपारी बारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने जोडले गेले. 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये नांदखेडा येथील रतन पवार यांच्या डाळिंब बागेची पाहणी करून, नर-मादी फुलांचे प्रमाण, एकूण झालेली फुलधारणा याबाबत चर्चा करून पुढील काळात निर्यातयोग्य डाळिंबासाठीचे तंत्र सांगण्यात आले. त्यानंतर शरद सवडे यांच्या द्राक्षबागेत अतिपावसाने झालेले नुकसान, तसेच यावर्षी करावयाच्या खरड छाटणी बाबतची चर्चा करून माहिती देण्यात आली. डोणगाव येथील डाळिंब बागेविषयी चर्चा करून बिघडलेल्या बहार प्रक्रियेत सुधारणा कशी करता येईल याबाबत सविस्तर विवेचन करण्यात आले. उमरखेड येथील नवनाथ फुके यांच्या शेडनेटमधील कारले व दोडक्याच्या लागवडीची पाहणी केली. 

भातोडी येथील रामेश्वर गायके यांची द्राक्षबाग, परतूर तालुक्यातील ब्रह्मवडगाव येथील उद्धव भिसे यांच्या आधुनिक पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या टरबुजाची पाहणी करण्यात आली. शेवटी पोखरी येथील गजानन पाचरणे यांच्या अतिघन आंबा लागवड बागेत छाटणी, आधार देणे व विद्राव्य खताचे नियोजन करण्यात आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

नागपूर येथून महाकॉटचे सरव्यवस्थापक जयेश महाजन यांनी एक गाव एक वाण, तसेच ‘कॉटन टू क्लॉथ’ या संकल्पनेबाबत माहिती दिली. व्हिडिओकॉन्फ्रन्सवरील चर्चेत नुझिवीडू सीडसचे कापूस पैदासकार डॉ. एस. एस. माने यांनी सेंद्रिय बोंडआळी नियंत्रणा संदर्भात मार्गदर्शन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com