
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनानंतर जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
औरंगाबाद : शहरातील सर्व शाळांतील १० वी व १२ वी वगळता इयत्ता ५ वी ते ११ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक राहणार नाही. हे विद्यार्थी पुर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतील. तथापि शाळांचे कामकाज नियमितपणे सुरू राहील. हा बदल २८ फेब्रुवारीपर्यंत अंमलात राहील. यानंतर कोरोना संक्रमणाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
वाचा - ‘शिर्डीला मित्रांसोबत दर्शनासाठी जाऊ नको’,असे सांगताच वडिलांवर राग धरुन सतरा वर्षांचा मुलगा बेपत्ता
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनानंतर जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या अनुषंगांने गुरुवारी (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेते श्री. पाण्डेय यांनी ही माहिती दिली. पांडेय म्हणाले,
ऑक्टोबरनंतर कोरोना रुग्णांची हळूहळू संख्या कमी होते गेली. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी ही संख्या खूप कमी होती.
वाचा - औरंगाबादकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, १३७ जण कोरोनाबाधित
मात्र गेल्या काही दिवसात ही संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा गेल्या वर्षभरात अनुभव घेतल्यानंतरही लोकांनी नंतर मास्क वापरणे, हात धुणे, फिजिकल डिस्टंस या त्रिसुत्रीचे पालन करणे गांभीर्याने न घेतल्याने कमी झालेली रुग्णसंख्या वाढत आहे. आता जर आपण सर्वांनी कोरोनाला गांभीर्याने घेतले नाही तर पुढे परिस्थिती आणखी गंभीर रूप धारण करू शकेल अशी भिती आहे. लोकांच्या सहभागाशिवाय कोरोनाचा मुकाबला शक्य नाही असे आवाहन केले.
वाचा - औरंगाबादच्या लासूर स्टेशनवर जनशताब्दी एक्स्प्रेस डाव्या संघटनांनी रोखली, केंद्र सरकारचा केला निषेध
यापुढे कारवाई तीव्र
श्री पाण्डेय म्हणाले, शहरात माजी सैनिकांच्या ३५ टीम झोननिहाय काम करत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांकडून आतापर्यंत या पथकांनी १ कोटी रूपयांचा दंड वसुल केला आहे. यापुढेही ही कारवाई आणखी तीव्र केली जाईल. कोचींग क्लासेस, मंगल कार्यालये, हॉटेल्समध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवले जात आहे किंवा नाही, काल सकाळपासून यासाठी नेमलेली पथके तपासण्या करत आहेत. सुरूवातीला त्यांना समज दिली जाईल. त्यांनंतर दंड आकारला जाईल आणि कोचिंग क्लास, मंगल कार्यालये सील करून गुन्हे दाखल केले जातील असे त्यांनी सांगीतले.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शाळा सुरू, विद्यार्थ्यांना सूट
कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील १० वी आणि १२ वी वगळता इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी, ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्षात उपस्थित राहणे बंधनकारक राहणार नसल्याचे स्पष्ट करून महापालिका प्रशासक श्री पाण्डेय म्हणाले, शाळांचे नियमित कामकाज सुरू राहणार असून १० वी व १२ वीचे विद्यार्थी शाळेत जाणार असल्याने शाळा राहणार नसल्याचे स्पष्ट केले. खासगी डॉक्टरकडे येणाऱ्या रुग्णांबाबत डॉक्टरांना शंका आली तर त्यांची कोविड तपासणी करण्यासाठी कळवावे. तसेच रेल्वेस्थानक, बसस्थानकावर चाचण्यासाठी चाचणी केंद्र सुरू केली आहेत. कोरोनाची तीव्रता वाढली तर कारवायांचीही तीव्रता वाढवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited - Ganesh Pitekar