esakal |  चिंता वाढली.. औरंगाबादेत कोरोनाचे आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

औरंगाबादकरांची डोकेदुखी आणखीन वाढली आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शहरात कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र, सोमवारी पुन्हा यात चार ने भर पडली आहे

 चिंता वाढली.. औरंगाबादेत कोरोनाचे आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद - औरंगाबाद शहरात दोन दिवस एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. रविवार दिलासादायक गेल्यानंतर सोमवारी (ता. 13) तब्बल चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. या सर्वांना त्यांच्याच नातलगांकडून संसर्ग झाला असून देवळाई, आरेफ कॉलनी, किराडपुरा येथील हे रुग्ण आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सकाळ ला दिली.
 
 औरंगाबादेत चार रुग्ण पॉझिटिव्ह झाल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चोवीसवर गेली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले की,  सिडको एन -चार येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्याकडे काम करणाऱ्या देवळाई येथील वाहनचालकालाही कोरोनाची लागण झाली होती. आता या चालकाच्या पस्तीस वर्षीय पत्नीचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

कावेरी जातीची अंडी मिळतील औरंगाबादच्या या केंद्रात  

शहरातील आरेफ कॉलनी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. आता त्याच्या 76 वर्षीय आजोबालाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 किराडपुरा येथील पॉझिटिव्ह अडोतीस वर्षीय पतीकडून त्याची तीस वर्षीय पत्नी आणि अकरा वर्षीय मुलीलाही कोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
या चारपैकी एक रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे तर तीन रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात मिनीघाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

 औरंगाबादेत रविवारपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत आज आणखी भर पडत हीच संख्या 24 वर गेली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांची डोकेदुखी आणखीन वाढली आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शहरात कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. या दोन दिवसात तब्बल 138 रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. पण एकाच दिवशी चार रुग्ण आढळल्याने आता परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे.