घाटीतील कोरोना योद्धांना वेतन मिळेना; निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन  

प्रकाश बनकर
Saturday, 22 August 2020

मागील तीन महिन्यांपासून घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळाले नाही. आमचे विद्यावेतन त्वरीत द्या, अशी मागणी करीत निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

औरंगाबाद : मागील तीन महिन्यांपासून घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळाले नाही. आमचे विद्यावेतन त्वरीत द्या, अशी मागणी करीत निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पगार न दिल्यास कोरोना रूग्णांवरील उपचारही बंद करण्याचा इशारा या डॉक्टरांनी दिला.

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

घाटी रूग्णालयात पाचशे जवळपास निवासी डॉक्टर आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना विद्यावेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आज (ता.२२) पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यापूर्वीही निवासी डॉक्टरांनी थकीत विद्यावेतन द्या अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता. मात्र घाटी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. 

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

निवासी डॉक्टर गेल्या आठवडाभरापासून विद्यावेतनासाठी घाटी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. विद्यावेतनाची रक्कम जमा झाली असून ती निवासी डॉक्टरांना लवकरच मिळेल, असे घाटी प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात येत होते.

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात 

मात्र अद्यापही विद्यावेतन न मिळाल्यामुळे या निवासी डॉक्टरांनी आज सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. विद्यावेतन मिळाले नाही तर कोरोना रूग्णांवरील उपचारही बंद करू, असा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत पगार जमा होतील, असे आश्वासन अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी आंदोलक डॉक्टरांना दिले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad GMCH news no payment doctor