वाचा.. औरंगाबादेत कोणकोणते परिसर सील

मनोज साखरे
Sunday, 5 April 2020

सिडको एन-४ , आरेफ कॉलनी, जलाल कॉलनी, अहबाब कॉलनी, पदमपुरा येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे हे भाग सील करण्यात आले आहेत. एक रुग्ण हा रहेमानिया कॉलनी येथे राहत होता नंतर ते त्याच्या मुलाकडे जलाल कॉलनी येथे राहायला गेला. त्यामुळे रहेमानिया कॉलनी, किराडपुरा तसेच परिसर सिल करण्यात आला आहे.

औरंगाबाद - पेशवेनगर, सातारा परिसरातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने या भागात खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

तेथील परिसर तसेच शहरात रुग्ण आढळलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून, निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. 

शहरातील ५८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा रुग्ण सातारा भागातील पेशवेनगर परिसरातील आहे. त्यामुळे सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे आणि त्यांच्या पथकाने हा भाग बॅरिकेड्स लावून सील केला आहे.

त्यानंतर महापालिकाकडून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या भागात सर्वेक्षणही करण्यात येत आहे. या परिसरातील काही नागरिकांचेही स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

गुरुवारी (ता. दोन) शहरात सिडको एन-चार आणि आरेफ कॉलनी येथील तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. रविवारी आणखी सहा संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात आणखी जास्त खबरदारी घेतली जात आहे.

सिडको एन-४ , आरेफ कॉलनी, जलाल कॉलनी, अहबाब कॉलनी, पदमपुरा येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे हे भाग सील करण्यात आले आहेत. एक रुग्ण हा रहेमानिया कॉलनी येथे राहत होता नंतर ते त्याच्या मुलाकडे जलाल कॉलनी येथे राहायला गेला. त्यामुळे रहेमानिया कॉलनी, किराडपुरा तसेच परिसर सिल करण्यात आला आहे. ज्या भागात रुग्ण आढळले ते भाग सील करण्यात आले आहेत. निर्जंतुकीकरण आणि खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात येत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Koronavirus News Patient found compound seal