मराठवाड्यातील सून चालते, जावयाला का आढेवेढे 

मधुकर कांबळे 
शनिवार, 11 जानेवारी 2020

मराठवाड्यातील मुली कुटूंबाला एकत्र बांधून ठेवतात, अडचणीच्या वेळी संपूर्ण ताकदीने कुटूंबामागे उभे राहण्याची त्यांच्यात क्षमता आहे म्हणुन मराठवाड्यातील मुलगी सून म्हणून प्राधान्य देणारे खूप जण आहेत.

औरंगाबाद -  मराठवाड्यातील मुलींना सून म्हणुन प्राधान्य देण्यासाठी राज्याच्या इतर भागातील लोक तयार होतात. मात्र मराठवाड्यात सून म्हणून स्वत:ची मुलगी देण्यासाठी कोणी प्राधान्य देत नाहीत हे चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन माजी मंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षातील आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. 

कलाग्रामच्या मैदानावर मराठवाडा असोशिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चर (मसिआ) च्यावतीने ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो 2020 निमित्त शनीवारी (ता.11) " युवा नेतृत्व उद्योजकता आणि मराठवाड्याचा विकास ' या विषयावर त्यांची मुलाखत झाली, यावेळी ते बोलत होते. 

एका प्रश्नाच्या उत्तरात पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाशी संबंधित एका वधू वर सूचक केंद्रचालकाच्या अनुभवाच्या अनुषंगाने आमदार संभाजी पाटील म्हणाले, मराठवाड्यातील मुली कुटूंबाला एकत्र बांधून ठेवतात, अडचणीच्या वेळी संपूर्ण ताकदीने कुटूंबामागे उभे राहण्याची त्यांच्यात क्षमता आहे म्हणुन मराठवाड्यातील मुलगी सून म्हणून प्राधान्य देणारे खूप जण आहेत.

संबंधित बातमी : " कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी 

 मात्र सततचा दुष्काळ, रोजगाराचा आणि पाण्याचा प्रश्न यामुळे मराठवाड्यात सून म्हणून आपली मुलगी देण्यास प्राधान्य देणारे फार कमी आहेत हा वधू वर सूचक केंद्र चालकाचा अनुभव सांगून हे चित्र बदलण्यासाठी, मराठवाड्यातील मुलगी सून म्हणून स्विकारण्याला जसे प्राधान्य दिले जाते तसे मराठवाड्यात भविष्यात मुलगी देण्यालाही प्राधान्य दिले जाईल अशी मराठवाड्यात परस्थिती निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू या असे मत व्यक्‍त केले. 

आपण नेहमी मराठवाड्यातील उद्योजकाची चर्चा करतो, मात्र पाण्याचे काय , पाणी असेल तरच उद्योग येतील आणि टिकतील. मराठवाड्याच्या नद्या एकमेकांना जोडणे म्हणजे चार उपाशी लोकांना एकत्र आणण्यासारखे आहे. जोपर्यंत पश्‍चिमी वाहीनी नद्यांचे पाणी मराठवाड्यातील नद्यांमध्ये खेळवले जात नाही तो पर्यंत मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. तो पर्यंत विकास होणार नाही.

पाणी नसेल तर उद्योग बंद करावे लागतील की काय अशी परिस्थिती निर्माण होते. मुख्यमंत्र्याच्या शुक्रवारी (ता.10) झालेल्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली. मात्र हा प्रश्‍न वेगाने सोडवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यायला हवे असे मत संभाजी पाटील यांनी व्यक्त केले. 

वाचा : या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल 

मराठवाड्यात उद्योग उभा राहीला पाहीजे. तरुणांना रोजगार मिळला पाहीजेत. काळानुरुप काही गोष्टीत बदल झाला पाहीजे, तंत्रज्ञानामध्ये बदल झाले तरच उद्योग वाढू शकतील. आधीच्या लोकांनी काही केले असे नाही त्यांनीही काळानुसार बरेच बदल केले आहेत. आपल्यालाही काही बदल करावे लागतील आणि नव्या पिढीला बरेच काही द्यावे लागले. प्रत्येक लोकप्रतिनिधी मंत्री होताना त्या माध्यमातून आपल्या भागात काय सुधारणा करता येवू शकतात याचा विचार करतात. पर्यटनात चांगल्या संधी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आदित्य ठाकरे हे नवे पर्यटनमंत्री यांना माझ्या सदीच्छा आहेत. नव्या सरकारमध्ये बरेच बदल होतील अशी अपेक्षा आमदार श्री. पाटील यांनी व्यक्‍त केली. यावेळी प्रदर्शनाचे समन्वयक सुनिल किर्दक यांनी त्यांना प्रश्न विचारत बोलते केले. 

वाचून तर बघा : मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad mahaexpo 2020 sambhji patil nilengekar