
प्रदर्शनाने मराठवाड्याची ताकद केली सिद्ध
औरंगाबाद : अवघी औद्योगिक वसाहत शहरात अवतरली आहे. हस्तकारागिरापासून ते मोठ्या उद्योगांचा बोलबाला "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2020' या प्रदर्शनातून दिसला. प्रदर्शनाच्या निमित्ताने मराठवाड्याच्या औद्योगिक वाटचालीचा लेखाजोखाच समोर आला आहे. देखण्या प्रदर्शनातून औद्योगिक ताकदही सिद्ध झाली आहे. या प्रदर्शनाने नागरिक, विद्यार्थी, उद्योजक भारावून गेले.
उद्योगविश्वाच्या या महामेळाव्यात औरंगाबाद, मराठवाड्यासह लुधियाना, दिल्ली, पुणे, बेंगलोर, नाशिक, नगर अशा विविध शहरांतील उद्योजक सहभागी झाले आहेत. ऑटोमोबाईल इंडस्ट्री, इंजिनिरिंग, ऍग्रिकल्चर आणि फूड प्रोसेसिंग, ऍनिमेशन, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, ट्रेडिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, सेवा उद्योग, एनजीओ; तसेच शैक्षणिक संस्था आणि बॅंकांनी आपल्या माहितींचे स्टॉल उभारले आहेत.
कोण कुठे म्हणाले - प्रकाश आंबेडकरांसाठी आमची दारे सदैव खुली
आठ डोम, चारशे स्टॉल
एक्स्पोमध्ये आठ डोम आणि 450 स्टॉल आहेत. यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रिज, बॅंका, हॅण्डलूम, हॅण्डिक्राफ्ट, ऑटोमेशन एनर्जी, ट्रेडिंग इलेक्ट्रिकल, ऍटो कॉम्पोनन्टस, ट्रेड मॅकॅनिकल्स, फूड आणि फूड प्रोसेसिंग, मशीन मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध स्टॉलचा समावेश आहे.
तिहासिक ठेवा- video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !
उद्योगांसह सरकारी कंपन्याही
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महाराष्ट्र लघू विकास महामंडळ, इंडो-जर्मन टूल रूम या कंपन्या आणि संस्थांसह सिडलर इलेक्ट्रॉनिक्स, इको एअर कूलिंग सिस्टीम, भाविक इंडस्ट्रिज, अपाला ऑटो कॉम्पानन्टस, हायगार्ड सिक्युरिटी डोअर अशा शेकडो उद्योगांनी आपल्या उत्पादनांचे प्रात्यक्षिके सादर केली. अगडबंब ट्रान्स्फॉर्मर, पॉवर जनरेटर, ऑटोमोबाईल पार्टस, जेसीबी, इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, सौरऊर्जेवरील उत्पादने अशी हजारो उत्पादनांचे हे प्रदर्शन उल्लेखनीय आहे.
हातमाग, हस्तकलेने वेधले लक्ष
लघुउद्योग विकास महामंडळातर्फे हस्तकला, हातमाग कारागिरांच्या वस्तूंचे प्रदर्शन लक्ष वेधून घेत होते. यामध्ये पैठणी कशी तयार केली जाते याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. एक पैठणी तयार करण्यासाठी पंधरा दिवसांपासून ते दीड महिन्यांपर्यंतचा वेळ लागतो. कमीतकमी पंधरा हजार ते दीड लाखापर्यंत पैठणीची किंमत असल्याचे आशिष बोंबले, कांता साबळे, रेणुका सोलाटे यांनी सांगितले.
शेकडो वस्तूंचा समावेश
प्रदर्शनात ज्यूट, धातूंपासून तयार केलेल्या वस्तू, हातमागावरील कपडे, चामड्याच्या वस्तू, विविध प्रकारची खेळणी, कागदी वस्तू, लोकर आणि रेशीमच्या विविध वस्तूंचे 60 स्टॉल प्रदर्शनात लावण्यात आले. महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे, औरंगाबादचे व्यवस्थापक अलका मांजरेकर आणि हस्तकला विभागप्रमुख अशोक कांबळे यांच्या प्रोत्साहनाने हस्तकलेचे हे प्रदर्शन लावण्यात आले.