Corona Effect : बकरी ईद घरीच, सामूहिक नमाजालाही बंदी..! औरंगाबादेत निघाले आदेश..

Eid-Al-Fitr-Mubarak.jpg
Eid-Al-Fitr-Mubarak.jpg

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ईद उल अजहा (बकरी ईद) घरीच साजरी करण्यात यावी, सार्वजनिक ठिकाणी जमून सामूहिक नमाज अदा करण्यास बंदी असेल, असे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. २२) काढले आहेत. ईदच्या दिवशी मशिद किंवा इदगाह परिसरातही जमण्यास मनाई असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन शासनस्तरावरून केले जात आहे. त्यानुसार महापालिकेचे प्रशासक श्री. पांडेय यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारने धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्यामुळे बकरी ईद नमाज मशिद किंवा ईदगाह, सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी घरीच अदा करावी. बकरी ईदच्यानिमित्ताने सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमू नये की गर्दी करू नये. कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच आणखी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, असेही श्री. पांडेय यांनी नमूद केले आहे. 

जनावरांची खरेदी केवळ ऑनलाइन 
सध्या जनावरांचे बाजारही बंद आहेत. त्यामुळे बकरी ईदसाठी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रतिकात्मक कुर्बानी करावी, असेही आवाहन श्री. पांडेय यांनी केले आहे. 

नियमांचे पालन करावेच लागेल 
बकरी ईद संदर्भात राज्य शासनाने नियम घालून दिले आहेत. त्याची अमंलबजावणी करणे आमचे काम आहे. शासनाने नियम बदलले तर आमची हरकत नाही. मात्र महाराष्ट्रातील नेते संयमी आहेत. समाजहिताचेच निर्णय ते घेतात. त्यानुसार बकरी ईदवरू वाद होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधासंदर्भात श्री. पांडेय यांनी दिली. 

(संपादन प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com