सायकल ट्रॅकसाठी औरंगाबादेतील 'हे' पाच रस्ते निश्चित !  

माधव इतबारे
Saturday, 17 October 2020

पहिल्या टप्प्यात १७ किलोमीटरचा असेल ट्रॅक 

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक विकसित करण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला होता. त्यानुसार पाच रस्ते अंतिम करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १७ किलोमीटरचा सायकल ट्रॅक तयार होईल, असे श्री. पांडेय यांनी सांगितले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

औरंगाबाद सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एएस्सीडीसीएल) गांधी जयंतीनिमित्त शहरात ‘सायकल फॉर चेंज’ फेरी काढली होती. यावेळी प्रशासक पांडेय यांनी शहरात स्वतंत्र सायकल ट्रॅक सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी जागेची निवड करणे, सायकल प्रेमीच्या सूचना ऐकून घेण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली होती. यावेळी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी देखील सायकल ट्रॅकसाठी मदत करण्याची भूमिका घेतली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यासंदर्भात श्री. पांडेय यांनी सांगितले की, सायकल ट्रॅकसाठी पहिल्या टप्प्यात पाच मोठ्या रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या रस्त्यांवर एकूण १७ किलोमीटरचा सायकल ट्रॅक तयार होईल. या रस्त्यावर सायकल ट्रॅक विकसित करण्यासाठी मार्किंग करणे, सिम्बॉल लावणे, कलर कोडींग करणे त्यानंतर दुसऱ्या टप्यात गरज असेल तिथे मुरूम टाकणे, आरसीसी किंवा गठ्ठू बसविणे अशी कामे केली जातील. शेवटच्या टप्‍यात साईन बोर्ड लावले जाणार आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हे आहेत रस्ते 

  • -सिडको ते हर्सूल टी पॉईंट 
  • -हर्सूल टी पॉइंट ते दिल्लीगेट 
  • -दिल्ली गेट ते बिबी का मकबरा 
  • -हॉटेल ताज ते सेव्हन हिल 
  • -रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक 
     

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation declares five roads for bicycle track