औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्ण आढळला : बीड बायपासच्या स्काय सिटीत फवारणी

दुर्गादास रणनवरे
Friday, 1 May 2020

बीड बायपास परिसरातील एमआयटी महाविद्यालयाजवळच्या स्काय सिटी येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे स्काय सिटीचा संपूर्ण परिसर जंतुनाशक औषधाने फवारणी करण्यात आला आहे. 

औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील एमआयटी महाविद्यालयाजवळच्या स्काय सिटी येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे स्काय सिटीचा संपूर्ण परिसर जंतुनाशक औषधाने फवारणी करण्यात आला आहे. 

महापालिकेतर्फे या भागात तात्काळ फवारणी करण्यात आल्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. स्काय सिटी येथे अग्निशमन दलाच्या बंबाच्या साह्याने फवारणी करण्यात आली.

बीड बाय पास, सातारा परिसरातील स्काय सिटी ही एकमेव 13 मजली इमारत असून, येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही मोठी खळबळ उडाली होती.

संशयित आरोपीच कोरोनाग्रस्त, औरंगाबादेत ३० पोलिस क्वारंटाईन

परंतु महापालिका आरोग्य विभागाने तात्काळ खबरदारी घेत या भागातील मुख्य रस्ते तसेच वसाहतीचा आतील भागात अग्निशमन बंबाद्वारे फवारणी केली. आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, जीवशास्त्रज्ञ डॉ. अर्चना राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही फवारणी करण्यात आली.

यावेळी महापालिका वॉर्ड क्रमांक 8 चे वॉर्ड अधिकारी श्री.दौड, सातारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेंद्र माळाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कराड, श्री.कावळे, पर्यवेक्षक शेख अन्वर, गायकवाड, राहुल वाकेकर, विशाल पंडित, भारत वाघ आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Sanitized Society On Beed Bypass