esakal | जारचे पाणी शासनाच्या रडारवर!
sakal

बोलून बातमी शोधा

water plant.jpg

हरित लवादाच्या आदेशानंतर मागविली माहिती 

जारचे पाणी शासनाच्या रडारवर!

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शुद्ध पाण्याच्या नावाखाली जार विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे; मात्र जारचे पाणी आयएसआय शिक्क्यासह विकले जावे, यासंदर्भात राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादने दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने जार व्यवसायाची माहिती मागविली आहे. यासंदर्भात पत्र प्राप्त होताच महापालिकेने देखील काम सुरू केले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
शहरासह ग्रामीण भागात शुद्ध व थंड पाण्याची मागणी वाढत आहे. त्यानुसार जारचा व्यवसायही वाढला आहे. हे पाणी कुठल्याही परवानग्या न घेता बेकायदेशीरपणे विक्री केली जात आहे. शहरात जागोजागी अशा प्रकारचे व्यवसाय सुरू झाले आहेत. यासंदर्भात विजय दुबलवाडीकर यांनी हरित लवादासमोर याचिका दाखल केली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याची दखल घेऊन हरित लवादाने राज्य शासनाला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. हरित लवादाच्या या आदेशानुसार नगरपालिका संचालनालयाने महापालिका व नगरपालिकांकडून जार विक्रीच्या व्यवसायाबद्दल माहिती मागविली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर राज्य शासन जार व्यवसायाबद्दल धोरण निश्चित करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)