लोकसंख्येच्या तुलनेत वॉर्डाची व्याप्ती मोठी : अजबनगर-कैलासनगर : (वॉर्ड क्र ६६) 

photo
photo

औरंगाबाद : अजबनगर-कैलासनगरची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. लोकसंख्या कमी असली तरी परिसीमा मोठी आहे. त्यामुळे अनेक भागांत विकासकामे होत नसल्याची ओरड या वॉर्डात केली जाते. अजबनगर - कैलासनगर या वॉर्डात अजबनगर, गौतमनगर, श्रीनिकेतन कॉलनी, रोकडा हनुमान कॉलनी, मोंढा नाका भागश:, कैलासनगर, संत एकनाथ कॉलनी या भागांचा समावेश आहे. 

अशी आहे रचना 

उत्तर दिशेला : सिल्लेखाना ते लक्ष्मण सावली रस्त्यावरील जोशी मंगल केंद्र ते शिवाजी हायस्कूलमार्गे कैलासनगर स्मशानभूमीपर्यंत. 
पूर्व दिशेला : श्री हनुमान मंदिर, कैलासनगर स्मशानभूमी ते साई रेसिडेन्सीमार्गे शर्मा पॅथॉलॉजी, रायगड बंगला ते गणपती मंदिर ते श्रीकृष्ण हॉस्पिटलपासून जालना रोडवरील आकाशवाणीसमोरील संत एकनाथ हाऊसिंग सोसायटीमधील भूखंड क्रमांक एकपर्यंत. 
दक्षिण दिशेला : आकाशवाणीसमोरील श्री संत एकनाथ सोसायटीमधील भूखंड क्रमांक एकपासून मोंढा नाकामार्गे क्रांती चौकपर्यंत. 
पश्चिम दिशेला : क्रांती चौक ते पैठण गेट ३० मीटर रुंद रस्तामार्गे, अजबनगर येथील कमानीपासून जोशी मंगल केंद्रापर्यंत. 

असा आहे वॉर्ड 

लोकसंख्या : ९६८२ 
अनुसूचित जाती : १६९२ 
अनुसूचित जमाती : ५० 

अजबनगर-कैलासनगर वॉर्डात गौतमनगरचा समावेश आहे. दलित समाजाची ही वसाहत असल्याने, या वसाहतीच्या विकासकामांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे. अन्य वॉर्डाचा जसा विकास झाला, तसाच गौतमनगर या भागातही विकास करावा. 
- सचिन नरवडे 

गौतमनगरचा अजबनगर-कैलासनगर वॉर्डात समावेश आहे. मात्र, विकासकामे करण्यात आली नाहीत. नगरसेवक वॉर्डात फिरकतच नाहीत. गौतमनगर या भागात पाइपलाइन जुनाट झाली असल्याने पाणी येत नाही. महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. 
- रत्नमालाबाई धीवर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com