या संस्थेची झाली तीन दालने सील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

भगवान शिक्षण प्रसारक मंडळाकडे मालमत्ता करापोटी एक कोटी 51 लाख 57 हजार 364 रुपये थकीत होती. त्यापैकी नऊ लाख 77 हजार 692 हजार रुपये भरण्यात आले. थकीत रक्कम भरण्यासाठी वारंवार विनंती केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने कारवाई करण्यात आल्याचे महावीर पाटणी यांनी सांगितले. 

औरंगाबाद- थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने बड्या थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली असून, शुक्रवारी (ता. तीन) भाजप एका पदाधिकाऱ्याशी संबंधित भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या (वायएसके) तीन कार्यालयांना सील ठोकले. वायएसकेकडे तब्बल एक कोटी 51 लाख 57 हजार 364 रुपये थकीत आहेत. त्यापैकी नऊ लाख 77 हजार 692 हजार रुपये भरण्यात आले. महापालिकेत शिवसेना-भाजपची युती तुटली असून, त्यानंतर अवघ्या काही दिवसात ही कारवाई झाल्यामुळे राजकीय रंग येण्याची शक्‍यता आहे. 

 

अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके 

महापालिकेची मालमत्ता करापोटी शहरात कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. एकूण थकबाकीचा आकडा साडेपाचशे कोटीच्या घरात गेला आहे तर यंदाची थकबाकी तब्बल दीडशे कोटी रुपये एवढी आहे. एकीकडे शहरात कोट्यवधी रुपयांची थकबाकी असताना दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. तब्बल तीनशे कोटी रुपये कंत्राटदारांची देणी आहे. म्हणून पदभार घेतात आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्या आदेशानुसार दीडशेहून अधिक मोबाईल टॉवरला सील लावण्यात आले होते. त्यानंतर या कंपन्यांनी थकीत कर भरला. दरम्यान बड्या व्यावसायिक थकबाकीदारांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी प्रभाग कार्यालय फचे वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांच्या पथकाने भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या चार कार्यालयाला सील केले. भगवान शिक्षण प्रसारक मंडळाकडे मालमत्ता करापोटी एक कोटी 51 लाख 57 हजार 364 रुपये थकीत होती. त्यापैकी नऊ लाख 77 हजार 692 हजार रुपये भरण्यात आले. थकीत रक्कम भरण्यासाठी वारंवार विनंती केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने कारवाई करण्यात आल्याचे महावीर पाटणी यांनी सांगितले. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! 

कारवाईला राजकीय रंग 
भगवान शिक्षण प्रसारक मंडळ भाजपचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्याशी संबंधित आहे. महापालिकेतील शिवसेना-भाजपची युती तुटली असून, त्यानंतर अवघ्या काही दिवसातच महापालिकेने ही कारवाई केल्यामुळे राजकीय वचपा काढण्यासाठी तर ही कारवाई केली नाही ना? अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान श्री. कराड यांनी फोन करून महापौरांना फोन करून मध्यस्थी करण्यासाठी गळही घातल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
अशी आहे थकबाकी 
थकबाकी सील केलेल्या मालमत्तेचे नाव 
76,4,176 व्यवस्थापकाचे दालन सील 
30,13,088 फार्मसी कॉलेजचे कार्यालय सील 
96,42 660 प्रशासकीय कार्यालय सील केले 

 
महापालिका प्रशासनाने केलेली कारवाई ही प्रशासकीय कारवाई आहे. यात राजकीय सूडाचा विषय नाही. थकबाकी असल्यानेच ही कारवाई करण्यात आली. 
नंदकुमार घोडेले, महापौर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News