esakal | आयुक्तांच्या दालनात शिमगा
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad amc news

वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम केले जात नसल्यामुळे नागेश्‍वरवाडी वॉर्डाच्या नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी होळीच्या दिवशी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या दालनासमोर सोमवारी (ता. नऊ) ठिय्या आंदोलन सुरू केले.

आयुक्तांच्या दालनात शिमगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गेल्या सात महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम केले जात नसल्यामुळे नागेश्‍वरवाडी वॉर्डाच्या नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी होळीच्या दिवशी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या दालनासमोर सोमवारी (ता. नऊ) ठिय्या आंदोलन सुरू केले. आयुक्तांसह, पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे रात्री उशिरा त्यांनी आयुक्तांच्या आश्‍वासनानंर आंदोलन मागे घेतले. 

नागेश्‍वरवाडी वॉर्ड क्रमांक ५१ येथील ड्रेनेजलाईन वारंवार चोकअप होत आहे. त्यामुळे ही लाईन बदलण्यात यावी, यासाठी नगरसेविका श्रीमती शिंदे वारंवार पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी जून महिन्यात तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी पाहणी केली होती. मात्र अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. कामाची २० लाखांची निविदा काढण्यात आली, मात्र कोणी काम करण्यास तयार नाही.

दरम्यान ड्रेनेज चोकअपमुळे येथील नागरिक त्रस्त असून, त्यांची समजूत काढताना नाकीनऊ येत आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांना वारंवार चोकअप काढण्यासाठी पाचारण करावे लागते. त्यामुळे त्रस्त झालेल्या श्रीमती शिंदे यांनी सोमवारी दुपारपासून आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी त्यांची भेट घेऊन आयुक्तांशी संपर्क साधण्याची प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. वॉर्ड अभियंता पी. जी. पवार यांनी दोन दिवसात काम सुरू केले जाईल, त्यामुळे आंदोलन मागे घ्या, अशी आयुक्तांतर्फे विनंती केली, त्यानुसार श्रीमती शिंदे आंदोलन मागे घेतले. 

आमदार, महापौरांनी फिरविली पाठ 
सोमवारी दुपारी आमदार प्रदीप जैस्वाल महापालिकेत आले होते. महापौर नंदकुमार घोडेले दिवसभर महापालिकेत होते, मात्र या दोघांनी श्रीमती शिंदे यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. दरम्यान आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांचा फोन बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

क्‍लिक करा : किती छान! पोलिस ठाण्याचा कारभार महिलांच्या हात