कोरोनाने आणला महापालिकेचा अर्थसंकल्प ताळ्यावर, घटले एवढे कोटी...

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद ः कोरोनाच्या संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा महापालिकेच्या उत्पन्नाला फटका बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षासाठी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी (ता. सहा) १,०९३ कोटींच्या आणि ३८ लाख ११ हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १७०० कोटी रुपयांचे हे बजेट आहे. 

दरम्यान, सर्वाधिक खर्च यंदा रस्ते, नवीन दिवे, नवीन बांधकामे यावर ४५८ कोटी रुपये होणार आहे. त्याखालोखाल उद्याने, पशूसंवर्धन, दवाखाने बांधकामे यावर ४२७ कोटी खर्च प्रस्तावित आहे. महापालिका निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता होती. त्यानुसार प्रशासनाने लेखा अनुदान सादर केले होते. लेखानुदानाची तरतूद ३१ जुलैला संपल्याने उर्वरित आठ महिन्यांसाठी अर्थसंकल्प गुरुवारी सादर करण्यात आला. याविषयी माहिती देताना, आस्तिककुमार पांडेय म्हणाले, की प्रारंभीची शिल्लक १२९ कोटी ५० लाख ५१ हजार रुपये गृहीत धरली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

९६३ कोटी ८५ लाख ३५ हजार रुपये या आर्थिक वर्षात जमा होतील असा अंदाज असून, पूर्वीची शिल्लक आणि जमा होणारा महसूल असा एकत्रित विचार करून १,०९३ कोटी ३५ लाख ८६ हजार जमा बाजू असलेला अर्थसंकल्प सादर केला. त्यात १०९२ कोटी ९७ लाख ७५ हजार रुपये खर्च अपेक्षीत धरण्यात आला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्प ३८ लाख ११ हजार रुपये शिल्लकीचा आहे. शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्रीराम महाजन, मुख्यलेखाधिकारी संजय पवार, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, विधी सल्लागार अपर्णा थेटे, उपअभियंता ए. बी. देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

प्रशासनानेच गतवर्षी केली २०२० कोटीची तरतूद 
महापालिकेचे बजेट पदाधिकारी मोठ्या प्रमाणात विकास कामे घुसडून फुगवितात. गतवर्षी प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प २०२० कोटींचा होता. यात पाणी पुरवठा योजना १६८० कोटी रुपये, रस्ते अनुदान २५० कोटी रुपये गृहीत धरण्यात आले होते. त्यानंतर स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने अर्थसंकल्प २७५० कोटी रुपयांवर नेला. यंदाचा मात्र १०९३ कोटी ३५ लाख ८६ हजारांचा अंदाजपत्रक आहे. तो गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १७०० कोटींनी कमी आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

असा येईल रुपया (आकडे कोटींत) 
सुरुवातीची शिल्लक – १२९ .५० 
बजेट ‘अ’ उत्पन्न - ६९५.४९ 
शासकीय अनुदान- १७१.८५ 
शासकीय देणे- ६.०० 
बजेट ‘क’ (ड्रेनेज व पाणी नवीन कामे)- ०.९० 
एकूण – १०९३.३६ 
 
असा जाईल रुपया (कोटींमध्ये) 
बजेट ‘अ’ महसूली खर्च (रस्ते, नवीन दिवे, नवीन बांधकामे)- ४५८ 
बजेट ‘अ’ महसूली खर्च (उद्याने, पशूसंवर्धन, दवाखाने बांधकामे )-४२७ 
बजेट ‘क’ भांडवली खर्च (वीजबिल, कर्ज निवारण, नवीन ड्रेनेज)-१३६ 
बजेट ‘क‘ भांडवली खर्च- ५३ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com