हे नियम मोडल्यास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद..

 Action on 443 moving vehicles without cause in lockdown
Action on 443 moving vehicles without cause in lockdown

औरंगाबाद - शहरामध्ये लॉकडाऊन असतानाही अशा परिस्थितीत नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत विनाकारण फिरणाऱ्या ४४३ वाहनांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत; तर चार गुन्हे सिटी चौक व वाहतूक शाखेकडून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन आहे. त्याअनुषंगाने औरंगाबाद शहर पोलिस दलातर्फे शहरांत जागोजागी चौकाचौकांत, गल्लीबोळांत नाकाबंदी पॉइंट व पेट्रोलिंग लावण्यात आली आहे.

पोलिसांनी सर्व धर्मगुरूंना सर्व धार्मिक स्थळांवरील जबाबदारांना आवाहन केले आहे. त्यात पूजाअर्चा, नमाज अदा करणे हे फक्त धार्मिक स्थळावरील लोकांनीच करावे. नागरिकांनी पूजाअर्चा आणि इतर गोष्टी घरीच कराव्यात. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिसांनी केलेले आवाहन 

  • नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवून जनतेमध्ये घबराट निर्माण करू नये. 
  • अत्यावश्यक सेवा जसे दूध, भाजीपाला, फळे, कृषीमाल विक्री केंद्र, किराणा माल पुरवठा विक्री केंद्र, बँक, एटीएम, दवाखाने, औषधी दुकाने, पोस्ट ऑफिस, पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी आवश्यक सेवा चोवीस तास सुरू राहणार आहेत. 
  • संबंधित दुकानदारांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. 
  • नागरिकांनी देण्यात आलेल्या सुविधा आणि उपाययोजनांचा गैरवापर करू नये; अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये. 
  • घरातील एकच व्यक्ती आजूबाजूच्या दुकानांतून खरेदी करेल आणि सुरक्षितपणे घरी जाईल याची दक्षता ज्याने-त्याने घ्यायची आहे. 
  • सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवावे. कमीत कमी एक मीटरचे अंतर दोन व्यक्तींमध्ये असणे आवश्‍यक आहे.
  •  
  • होम क्वारंटाइन केलेल्यांनी हे करा 

होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांनी लोकांपासून संपर्क टाळायला हवा. त्यांनी घरीच थांबावे. विनाकारण शहरात किंवा घराबाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. 

सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा 
लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९६ आपत्ती प्रतिबंध अधिनियम २००५ व भारतीय दंडविधान संहितेच्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com