औरंगाबादेत कार्यकर्त्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

संकपाळे यांनी लिहिलेली चिठ्ठी समोर आली आहे. माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. तो खोटा होता. त्यामुळे कंटाळुन आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद असल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद : औरंगाबादेतील जयभवानीनगर भागातील एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. सहा) रात्री आठनंतर घडली. पोलिसाकडून त्रास झाल्यामुळे आत्महत्या केल्याचे कार्यकर्त्याने चिठ्ठीत लिहिलेल्या माहितीवरुन समोर आली. अशी माहिती सुत्रांनी दिली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार, पंकज साहेबराव संकपाळे (वय 30, रा. जयभवानीनगर, गल्ली क्रमांक 12) असे मृताचे नाव आहे.

तीन वर्षांपुर्वी त्यांच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात एक फिर्याद दाखल करण्यात आली होती. यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात त्यांना अटकही झाली होती.

परंतु नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे यात चार्जसिटही दाखल झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. गुरुवारी रात्री पंकज संकपाळे यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्येची बाब समजल्यानंतर नातेवाईकांनी मुकुंदवाडी पोलिसांना कळविले. दरम्यान संकपाळे यांनी लिहिलेली चिठ्ठी समोर आली आहे. माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. तो खोटा होता. त्यामुळे कंटाळुन आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद असल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात आले.

अटक करणाऱ्या तत्कालीन पोलिसांसंबंधीत मजकुराची ही चिठ्ठी असल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान शुक्रवारी (ता. सात) पंकज यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. परंतु मृतदेह नातेवाईकांनी दुपारपर्यंत ताब्यात घेतला नव्हता. दरम्यान पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरु असून अधिक तपास करण्यात येत आहे. 

हेही वाचा :53 आमदार,खासदारांना पाणी प्रश्‍नावरील बैठकीचे वावडे (वाचा कोण आहेत ते)...  
हेही वाचा :त्या आमदारांना बांगड्या पोस्टाने पाठवणार, विद्यार्थी संघटनांचा आक्रोश 

  अन्‌ आमदार प्रशांत बंब म्हणाले, कोण चिखलीकर....   

पंकजा मुंडेच्या आंदोलनावर टिकेची झोड, तरीही प्रशांत बंब बोलवणार लोकप्रतिनिधीची बैठक  

सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Activist Commits Suicide