सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या औरंगाबादच्या या वास्तुकडे कुणी लक्ष देईल का? 

File Photo
File Photo

औरंगाबाद ः औरंगाबादचे जुने शासकीय कला महाविद्यालय अनेक दिग्गज कलाकार या महाविद्यालयाने घडविले, पण हीच वास्तू आता दुर्लक्षित आहे. या महाविद्यालयाने सुवर्णमहोत्सवी वर्षात आता पदार्पण केले; पण महाविद्यालयाची आजची अवस्था खूपच बिकट असून या ऐतिहासिक वास्तूची फार दुरवस्था झाली.

या जनाना महल सारख्या वास्तूकडे पाहणारे कोणीच दिसत नाही हि खंत असुन महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी मात्र शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

या वास्तुबाबत शासन दरबारी, लोकप्रतिनिधीना या कडे लक्ष देण्यास वेळ नाही. आता तेथे अतिक्रमण सुरु झाले असल्याचेही महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या शाकम कनेक्ट या संघाकडून सांगितले जात आहे. २०१५ ला हैदराबादच्या ‘सालारजंग’ ने याच संपूर्ण जुन्या शासकीय कला महाविद्यालयावर कब्जा केला होता, त्यावेळेस ‘शाकम कनेक्ट’ या माजी विद्यार्थी संघाने शासनदरबारी जोरदार प्रयत्न व प्रश्न मांडून जुने महाविद्यालय सालारजंगच्या हातातून मुक्त केले होते.

या सर्व गोष्टी कडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अनोख्या चित्रप्रदर्शन, व प्रात्यक्षिकेचे आयोजन केले होते. ही वास्तू कशी वाचवता येईल यासाठी समाजजागृती करण्यात येत असुन यामुळेच हे प्रदर्शन जुन्या महाविद्यालयाच्या अशा अवस्थेत मांडले आहे.

वर्षभर राबविणार उपक्रम

शाकम कनेक्ट सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर, प्रत्येक महिन्यात कार्यक्रम घेणार आहे. आमचा सर्वात जास्त लक्ष सध्या शिक्षण घेत असलेले विधार्थी आहे. त्यांना शिक्षण घेतल्यावर बाहेर कोणत्या गोष्टीला समोर जावे लागते, याक्षेत्रातील दिग्गज लोकांचे सेमिनार, कलाकाराचे ऑनलाईन मुलाखाती, प्रात्याक्षिके व कार्यशाळा, कलाकाराचे माहितीपर फिल्म तयार करणे, माजी विदार्थी कलावंताचे एक मोठे चित्रप्रदर्शन जानेवारी मध्ये औरंगाबाद मध्ये घेण्यात येणार आहे. शाकमच्या पन्नासव्या वर्षानिमित एक स्मरणिका काढण्यात येणार आहे. 

वार्षिक कला प्रदर्शनात प्रोत्साहन पर बक्षीसे, पुरस्कार जाहीर करणे. कॅम्पस प्लेसमेंट साठी मुंबई व पुण्यासह महाराष्ट्रातील विविध कंपन्यांना औरंगाबादकडे आकर्षित करून नवीन मुलांना नोकरी व व्यवसायासाठी मदत करणे सध्याच्या कला महाविद्यालयाचा विकास, महाविद्यालयात नवीन अद्ययावत कम्प्युटर, चित्रकलेसाठी लागणारे साहित्य, लाईट, कॅमेरा, लाब्ररी, गरीब विधार्थीना मदत करणे, आजी माजी विधार्थी मध्ये कामाची देवाणघेवाण करणे, माजी विद्यार्थ्यांची माहीती अद्यावत करणे, दर दोन वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व अंतर्गत व्यवसायाची व स्किल्सची देवाण घेवाण करणे. ह्या सारखे कार्यक्रम "शाकम कनेक्ट" अधून मधून वर्षभर राबवणार आहोत.
-
या आहेत मागण्या ः

  • जुन्या शासकीय कला महाविद्यालयाचे जतन करून येथे कायमस्वरूपी एक "आर्ट गलरी" तयार करावी.
  • आर्ट कल्चरची मोठी देवाण-घेवाण करण्याऱ्या कलावंताचे "आर्ट कल्सटर" निर्माण करावे
  • औरंगाबाद जिल्ह्यात ललित कला सेन्टर निर्माण होऊ शकले नाही ते उभारावे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे.
  • औरंगाबाद ही जागतिक पर्यटन शहराची राजधानी, त्यामुळे जनाना महलचा मोठे ऐतिहासिक व कलात्मक स्थळ म्हणुन विकास करावा.


सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्‍वभुमीवर शाकम कनेक्ट आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय याचा संयुक्त विद्यमाने जुने शासकीय कला महाविद्यालयाच्या (शाकम) सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयात १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ऐतिहासिक दिवशी झाली. महोत्सव वर्षाचे उदघाटन औरंगाबादचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, राहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा उपस्थितीत लोगोचे अनावरण करून करण्यात आली. 

शाकमच्या औरंगाबाद येथील माजी विद्यार्थ्यांच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन, तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी प्रात्यक्षिकाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. श्री गोविंद पवार, श्री दिलीप बड़े, भागवत , सुनील चरपे, महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश वडजे, यांचा हस्ते करण्यात आले. प्राचार्य रमेश वडजे यांनी यावेळी वस्तूच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नमूद केले ही वास्तू कलाकाराचे माहेरघर आहे ही वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करू असे ते म्हणाले यावेळी माजी अधिष्ठाता गोविंद पवार व भागवत जमादार आणि गजानन चरपे यानी आपले विचार माडले. दिलीप बड़े यांनी आपल्या अध्यक्षीय समारोप करून शुभेच्छा दिल्या.  

या वेळी प्रा. महिंदा खाजेकर, यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली. नंदकुमार जोगदंड, राजू परमेशोर, प्रा. विजया पातुरकर, प्राचार्य उदय भोईर, मेघा पाध्ये, डॉ. सर्वेश नद्रेकर, मोईन शेख, किशोर निकम, नरेश महाले, वैशाली टाकलकर, वर्षा थोरात, चंद्रकांत जोशी, महिंद्र खाजेकर या सर्वांनी आपल्या कलाकृती माडल्या होत्या.

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन शाकम कनेक्टचे मोईन शेख, नरेश लहाने, किशोर निकम, महेश औटे, श्याम तापसकर,रमेश माळगे, धर्मेश चोरीसिया, नंदकुमार जोगदंड, वैशाली टाकळकर, मिलिंद भिते,प्रकाश पाखरे, प्रकाश रोहिणीकर, शाम जैस्वाल,बाबा दाभाडे, अशोक गठडी, संजय मुळे, संजय खत्री, डॉ.सर्वेश नांद्रेकर, आरतीश्मल जोशी, वर्षा थोरात, दत्ता वाणी, बाळकृष्ण छडीदार,विजया पातुरकर, मेघा पाध्ये, सोपान कुरवंडे, गणेश गुले, नारायण सोनवणे,राहुल वेलदोडे, बाबुराव ढोकणे,किशोर जोह्रले, विनायक टाकळकर, रवी पवार,श्रीकांत कॅडेपुरकर,बालाजी टाक,सिद्धार्थ ब्रामा,रमेश गोद्वाल, संजय जगताप, मकरंद पवार, राजू करते,मनोहर कापसीकर,संजय टोणपे, गणेश देशपांडे,विनय आचार्य, करीत आहे. "शाकम कनेक्टच्या" फेसबुक, युटूब, इस्टाग्रामच्या पेज हा कार्यक्रम लाईव प्रसारित करण्यात आला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com