घरात इलेक्‍ट्रीशियन कामाला आला रॅक सरकवले वाचा मग झाले काय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

औरंगाबाद : सिडको भागात एका घरात काम करताना इलेक्‍ट्रीशीयनने दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी (ता. 11) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हेशाखा पोलिसांनी संशयिताला रविवारी (ता. 12) ताब्यात घेतले.

 पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रत्नाकर प्रभाकर खाडे (रा. जयभवानीनगर) असे संशयिताचे नाव आहे. सिडकोतील अनुजा संदीप जोशी यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या आई शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वयंपाक खोलीत काम करीत होत्या. त्यावेळी त्यांना रॅक सरकविण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांच्या आई स्वयंपाक खोलीतून बाहेर आल्या.

तेव्हा दागिन्यांची पिशवी रॅकच्या बाहेर असल्याची त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी घरातील घरात काम करणारा इलेक्‍ट्रीशियन खाडे याच्याकडे दागिन्यांच्या पिशवीबाबत विचारण केली. त्यावर तो निरुत्तर झाला. त्याच्यावर संशय बळावल्याने अनुजा जोशी यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खाडे व इतरराविरुद्ध तक्रार दिली. त्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखा पोलिसांनी सुरू केला. संशयित खाडे याची चौकशी केली त्यावेळी त्याने चारीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता चार लाखांचे दहा तोळे दागिने घरात सापडले. दागिने व खाडे यास ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक उपनिरीक्षक मनोज शिंदे, नितीन मोरे, पोलिस नाईक विलास वाघ, आप्पासाहेब खिल्लारे, शिपाई विशाल पाटील यांनी केली. 

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Came to work at home and stole jewelry