
आजपर्यंत एकूण १ हजार २३० जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण १४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता. २४) एकूण २४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ७६३ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २३० जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण १४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी ४८ जणांना सुटी झाली. यात शहरातील ४१ व ग्रामीण भागातील सातजणांचा समावेश आहे. आजपर्यंत ४५ हजार ३९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!
शहरातील बाधित(कंसात रुग्णसंख्या) : जाधववाडी (१), पैठण रोड (१), शहानूरवाडी (१), म्हसोबानगर (१), नक्षत्रवाडी (१), अन्य (५), रामतारा कॉलनी (१), गजानन मंदिर, गारखेडा (१), श्रेयनगर (१), एन चार सिडको (१), शिवाजीनगर (१), घाटी परिसर (१), सिल्क मिल कॉलनी (१), चेतनानगर (३)
औरंगाबादच्या ताज्य बातम्या वाचा
ग्रामीण भागातील बाधित : केकटजळगाव, पैठण (१), शिवाजीनगर, कन्नड (१), अन्य (२)
--------
कोरोना मीटर
------
बरे झालेले रुग्ण : ४५३९०
उपचार घेणारे रुग्ण : १४३
एकूण मृत्यू : १२३०
----
आतापर्यंतचे बाधित : ४६७६३
----
Edited - Ganesh Pitekar