esakal | Corona Update: औरंगाबादेत ४२ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४५ हजार ५२० कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Covid

आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ६६७ झाली.

Corona Update: औरंगाबादेत ४२ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४५ हजार ५२० कोरोनामुक्त

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.२१) एकूण ४२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ६६७ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २२९ जणांचा मृत्यू झाला. सध्या २१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ७२ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४५ हजार ५२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

हृदयविकाराच्या झटक्याने जवानास वीरमरण, देशसेवेसाठी सेवाकाळ घेतला होता वाढवून


शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या)  : बजाजनगर (४),एसआरपीएफ कॅम्प परिसर (१),धूत हॉस्पिटल,परिसर (१),मयुर पार्क (१), दर्गा परिसर (१), नारायण पुष्प हौ. सोसायटी (२), एन-२ सिडको (१), महाराष्ट्र पब्लिक स्कुल परिसर (१), कल्पतरु हौ. सो. (१), बीडबाय पास परिसर (२), एन-९ सिडको (१),घाटी परिसर (१), भारत नगर (१), गुरुगणेश नगर (१), गारखेडा परिसर (१), अन्य (१२) 

ग्रामसेवकाच्या आत्महत्येचे ‘झेडपी’त तीव्र पडसाद, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 


ग्रामीण भागातील बाधित : नागापूर, कन्नड (१), अन्य (९) 

एकाचा मृत्यू 
शहरातील एका खासगी रुग्णालयात ६० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
---
कोरोना मीटर 
---- 
बरे झालेले रुग्ण : ४५५२० 
उपचार घेणारे रुग्ण : २१८ 
एकुण मृत्यु : १२२९ 
----- 
आतापर्यंतचे बाधित : ४६६६७ 

Edited - Ganesh Pitekar