आरोपी कितीही चतुर असला तरीही पुरावे मागे सोडतोच

मनोज साखरे
गुरुवार, 9 जानेवारी 2020

अभिनेते शिवाजी साटम यांचा "दया कुछ तो गडबड है' हा फेमस डायलॉग आपणाला आठवत असेल. गुन्हेगारी कृत्यात पुरावे म्हणून फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाला न्यायालयीन प्रक्रियेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैज्ञानिक, तांत्रिक विश्‍लेषणामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यात फॉरेन्सिकचा मोठा वाटा आहे. 

औरंगाबाद - खून झाला की मारेकरी पसार होतो, पण तो घटनास्थळी पुरावे सोडून जातो असे म्हणतात. अर्थात तो तिथे काय सोडून जातो याचा त्यालाही लवकर पत्ता लागत नाही. तोपर्यंत वेळ गेलेली असते आणि या वेळेत पोलिस, फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळाचा ताबा घेतात.

तेथील पुरावे, पडलेल्या विविध वस्तू खूप काही बोलून जातात, तपासाला दिशा देतात आणि खून्यापर्यंत नेतात. म्हणजेच एका अर्थाने घटनास्थळ बोलते असे म्हटले जाते. घटनास्थळाला बोलके करण्यात फॉरेन्सिकची मोठी मदत ठरत आहे. 

एखाद्याच्या खूनानंतर मारेकरी बहुदा पलायन करतात. काहीवेळा तर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न होतो. पण पुरावा नष्ट करणे हाच एक पुरावा म्हणून काहीवेळा समोर येतो आणि मारेकरी पोलिसांच्या कचाट्यात येतो. हे अगदी सहज होते असे नाही. त्यासाठी फॉरेन्सिकची मोठी मदत लागते. पोलिसांचा तपास जिथे थांबतो तिथे वैज्ञानिक व तांत्रिक पद्धतीने काम सुरु होते.

हेही वाचा : video : 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरली होती ही बंदूक. 

मग फॉरेन्सिकवर (न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा) मोठी जबाबदारी वाढते. रक्ताचे डाग, कपडे, फिंगरप्रिंट तसेच घटनास्थळावरील विविध वस्तू हस्तगत करुन त्याचे विश्‍लेषण केले जाते. चित्रपटात किंवा गुन्ह्यासबंधीत टीव्ही-मालिकांत फॉरेन्सिकचे महत्व दाखवून देण्यात आले आहे.

अभिनेते शिवाजी साटम यांचा "दया कुछ तो गडबड है' हा फेमस डायलॉग आपणाला आठवत असेल. गुन्हेगारी कृत्यात पुरावे म्हणून फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाला न्यायालयीन प्रक्रियेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैज्ञानिक, तांत्रिक विश्‍लेषणामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यात फॉरेन्सिकचा मोठा वाटा आहे.

हेही वाचा : द्विधा व्यक्तीमत्वाबाबत निराश आहात? सोडा चिंता हे वाचा  

गून्ह्यानंतर पुढे काय.. 

  1. घटनास्थळी गुन्हा कसा घडला व तपासाची दिशा ठरविली जाते. 
  2. गुन्ह्यासाठी कोणत्या दिशेने मारेकरी आला व गेला याचाही विचार केला जातो. 
  3. विविध प्रकारच्या क्राईमसीनवरुन विविध प्रकारच्या तपास पद्धतीचा वापरही केला जातो. 
  4. जर गुन्हा बाहेर घडला तर स्पायरल मेथड यूज केली जाते. स्वरुपावरुन चार-पाच मेथड वापरल्या जातात. 
  5. घटनास्थळी आढळून आलेल्या पुराव्यांना क्रमांक दिले जातात. 
  6. घटनास्थळ प्रोटेक्‍ट करण्याचे, साबूत ठेवण्याचे काम केले जाते. 
  7. घटनास्थळाशी छेडछाड होऊ नये म्हणून सील लावले जाते. 
  8. घटनास्थळी फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी केली जाते. नजरेतून एखादा पुरावा सुटला तरी तो फोटोतून दिसून येतो. 
  9. मारेकऱ्याला शोधण्यासाठी घटनास्थळाचा प्रत्येक पुरावा अत्यंत महत्वाचा आहे. 
  10. पुरावा लिंक लावून देतो की कोणती व्यक्ती घटनास्थळाशी सबंधित आहे. 

फॉरेन्सिक सायन्सला महत्व 
गुन्ह्यांचे स्वरूप आणि तंत्र बदलत आहे. तसेच त्यावर अंकुश लावण्याच्या पद्धतीत आणि उकल करण्यातही बदल होत आहेत. अशा गुन्ह्यांची उकलीसाठी तांत्रिक व वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब होत आहे. घटनास्थळावरील वस्तू पुरावे म्हणून उपयुक्त ठरतात. त्यामुळे तपासात फॉरेन्सिक सायन्स मैलाचा दगड ठरत आहे. वैज्ञानिक विश्‍लेषणाचा उपयोग गुन्ह्यांच्या उकलीपासून आरोपींना शिक्षा होण्यात महत्वाचा ठरत आहे. 

एक धागा पोचवतो मारेकऱ्यापर्यंत.. 
पुराव्याचा एक धागा गुन्हेगारापर्यंत पोचण्यास मदत करु शकतो. पुराव्यांना धक्का लागू नये म्हणून ते गोळा करताना खास खबरदारी घेतली जाते. 
विशिष्ट बॅगामध्ये हे पुरावे गोळा केले जातात. फॉरेन्सिकशिवाय विशिष्ट व्यक्तींनाच घटनास्थळी प्रवेश असतो. 
-प्रिया तगरे, फॉरेन्सिक महाविद्यालय, औरंगाबाद. 

 
हेही वाचा : तीन इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरची होती खंत 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News -The crime scene of the murder speaks to the scene