तीन इंजेक्‍शन्स घेऊन आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरची होती खंत 

मनोज साखरे
Wednesday, 8 January 2020

मी माझे जीवन विविध प्रकारची इंजेक्‍शन्स घेऊन संपवत आहे. या घटनेला माझ्याशिवाय कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये.' असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले. त्यात आणखी एक बाब त्यांनी नमूद केली. ती म्हणजे शेषाद्री यांना अगदी निष्णात डॉक्‍टर बनायचे होते. पण उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सोशल एन्झायटी व बायपोलार आजार अडथळा ठरत होता. त्यामुळे पंधरा दिवसांपासून आत्महत्येचे विचार मनात सुरु होते. ही बाब अत्यंत विचार करायला लावणारी आहे.

औरंगाबाद - "चांगले डॉक्‍टर व्हायचे होते, परंतु होता येत नव्हते. आजारामुळे माझे उद्दीष्ट साध्य होत नव्हते.'' अशी खंत आत्महत्या करणाऱ्या डॉ. के. शेषाद्री यांच्या चिठ्ठीतून व्यक्त झाली चिठ्ठीतील मजकुराबाबत बेगमपूरा पोलिसांनी माहिती दिल्यानंतर ही बाब समोर आली. पंधरा दिवसांपासून मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. असेही चिठ्ठीत नमूद आहे. 

स्वतःला मनोविकार जडल्याच्या संशयातून घाटी रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. के. शेषाद्री गौडा (वय 28, मूळ रा. वेल्लूर, कर्नाटक, ह. मु. श्रद्धा अपार्टमेंट, बेगमपुरा) यांनी सलाईनद्वारे तीन इंजेक्‍शन्स घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना डॉ. शेषाद्री यांच्या खोलीत एक चिठ्ठी हाती लागली होती.

या चिठ्ठीतला मजकूर अत्यंत विचार करायला लावणारा आहे. "मला लहानपणापासून मोठे डॉक्‍टर व्हायचे होते. त्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला; मात्र मला बायोपोलार डिसऑर्डर, सोशल एन्झायटी हा आजार असल्याचा संशय आहे. त्यामुळे आत्महत्येचा विचार करीत आहे.

मी माझे जीवन विविध प्रकारची इंजेक्‍शन्स घेऊन संपवत आहे. या घटनेला माझ्याशिवाय कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये.' असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले. त्यात आणखी एक बाब त्यांनी नमूद केली. ती म्हणजे शेषाद्री यांना अगदी निष्णात डॉक्‍टर बनायचे होते. पण उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सोशल एन्झायटी व बायपोलार आजार अडथळा ठरत होता.

त्यामुळे पंधरा दिवसांपासून आत्महत्येचे विचार मनात सुरु होते. ही बाब अत्यंत विचार करायला लावणारी आहे. उत्तुंग महत्वकांक्षी असलेल्या शेषाद्री यांना या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण त्यांनी या आजारावर उपचार केल्याचे पोलिसांच्या तपासातून अद्याप तरी आढळून आलेले नाही. 

हेही वाचा : 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरली होती ही बंदुक 

सुवर्णपदकाचे होते मानकरी 

डॉ. शेषाद्री गौडा यांनी एमबीबीएस कर्नाटकातून तर एमडी मेडिसीन ही डिग्री घाटी रुग्णालयातून पूर्ण केली होती. शेषाद्री यांनी या एमडी मेडीसीनमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले होते. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनीही त्यांचा नुकताच सत्कार केला होता. 

घाटीत शोकाकूल वातावरण 

शेष्याद्री गौडा यांनी आत्महत्या केल्यानंतर घाटीत सर्व वातावरण शोकाकुल झाले होते. सात जानेवारीला सकाळी अकरा वाजता उत्तरीय तपासणीवेळी सर्व डॉक्‍टर घाटीत जमा झाले होते. सकाळी साडेआठ वाजता त्याचे वडील भाऊ आणि मामा घाटीत दाखल झाले होते. त्यांची डॉक्‍टरांनी त्यांची समजूत घातली. माझा भाऊ असे काही करेल यावर विश्वासच बसत नसल्याचे भाऊ जितेंद्र गौडा यांनी सांगितले. नंतर पोलिसांनी त्यांना घटनेचे फोटो तसेच इतर माहिती सांगितली. 

डॉक्‍टरांनी वाहिली श्रद्दांजली 
शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्‍टरांनी शेष्याद्री यांना श्रद्धाजली वाहिली. यावेळी भट्टाचार्य यांना अश्रु अनावर झाले होते.दुपारी दीडच्या सुमारास त्याचे पार्थीव घेवून ते गावी रवाना झाले. 

हेही वाचा :

द्विधा व्यक्तीमत्वाबाबत निराश आहात? मग चिंता सोडा हे वाचा 

तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेऊन गोल्डमेडीलीस्ट डॉक्‍टरची आत्महत्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghati Aurangabad Hospital Gold Medalist Doctor Suicide Aurangabd Breaking News