
लागवडीनंतर सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खताचा वापर करण्यात आला. तण काढणी करण्यात आली. लागवडीनंतर सात हजार रुपये खर्च करण्यात आला.
विहामांडवा (जि.औरंगाबाद) : मनात जिद्द असली तर आपण काहीही करू शकतो हे खंडाळा (ता.पैठण) येथील एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्यांनी पहिल्यांदाच वीस गुंठ्यात गलांडा फुलांची लागवड करून एक लाख रुपये उत्पन्न मिळविले आहे. खंडाळा येथील शेतकरी शहादेव त्र्यंबक सुराशे यांनी पहिल्यांदाच आपल्या वीस गुंठ्यांमध्ये गलांडा जातीचे फुले लागवड केली. त्यांना लागवडीत तीन हजार रुपये खर्च आला. सरी पद्धतीने फुलाला पाणी देण्यात आले.
वाचा - आईवडिलांची परिस्थिती पाहवत नसल्याने वैशालीने उचले टोकाचे पाऊल, लग्नाचे स्वप्न राहिले अधूरे
लागवडीनंतर सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खताचा वापर करण्यात आला. तण काढणी करण्यात आली. लागवडीनंतर सात हजार रुपये खर्च करण्यात आला. लागवडीपासून काढणीपर्यंत एकूण दहा हजार रुपये खर्च झाल्याचे शहादेव यांनी सांगितले. उत्तम मशागत केल्याने वीस गुंठ्यात एक लाखाचे उत्पन्न झाले आहे. गलांडा जातीचे फुलाचे पिक हे सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या हातात पडले.
वाचा - संजना जाधव देणार माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना टक्कर? सरपंच, उपसरपंचांच्या सत्काराला लावली हजेरी
पहिल्यांदाच फुलाची लागवड करून चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी शेतात गर्दी करून विचारणा करित आहेत. खंडाळा येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले की दोन एकर छत्तीस गुंठे शेतीपैकी 20 गुंठ्यांमध्ये जूनमध्ये गलांडा फुलांची लागवड करून निव्वळ नफा 90 हजार रुपये सहा महिन्यात उत्पन्न मिळवले आहे. शहादेव यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून शेती बरोबर दूध व्यवसाय देखील करतात. सुराशे कविमनाचे शेतकरी असून त्यांचा आभाळ माती हा काव्यसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून प्रकाशित झाला आहे.
मी माळरानावर शेतात गलांडा नावाच्या फुलाची पहिल्यांदा लागवड केली असून मला वीस गुंठ्यात एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तरीपण तरुणाने शिक्षण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता तंत्रशुद्ध शेती केली तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
- शहादेव सुराशे, शेतकरी, खंडाळा
संपादन - गणेश पिटेकर