esakal | ठोक मोर्चातर्फे क्रांती चौकात ठिय्या 
sakal

बोलून बातमी शोधा

krati morcha.jpg

समाजासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांसह विद्यार्थी उपस्थित 

ठोक मोर्चातर्फे क्रांती चौकात ठिय्या 

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासह मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे शनिवारी (ता. ८) क्रांती चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. समाजासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांसोबत विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आहे. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात अभूतपूर्व मोर्चे काढले. तरीदेखील समाजाच्या बऱ्याच मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यानंतर हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकापासून २३ जुलैला आंदोलन सुरू केले होते, या आंदोलनाची दखल घेत ३० जुलैला मुंबईत बैठक देखील घेण्यात आली. पाच ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करण्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता. आठ ऑगस्टपर्यंत वाट पाहून आंदोलनास सुरुवात केल्याचे रमेश केरे, आप्पासाहेब कुढेकर यांनी सांगितले. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांमध्ये कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान मृत पावलेल्या ४२ आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घेणे. मुंबई येथील आझाद मैदानात ४७ दिवस बसलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे. सारथीसाठी शंभर कोटीचा निधी द्यावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास पाचशे कोटी रुपयांचा निधी द्यावा. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी आर्थिक तरतूद करणे. मराठा वस्तीगृह स्थापन करणे. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणे. तसेच हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकासाठी गोदावरी पुलाजवळ सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून द्यावी. अशा मागण्या आहेत. 

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

आंदोलनात राहुल पाटील, अनिल सपकाळ, पवन उफाड, विनोद तारक, सदानंद जाधव, रामेश्वर टोणपे, रवींद्र गावंडे, मनोज मुरदारे, नवनाथ चौधरी, सुरेश गायकवाड, भरत कदम, पंढरीनाथ गोडसे, अशोक मोरे, गणेश जगधने, ज्ञानेश्वर लेवडे, अण्णा काटे, कृष्णा पैठणे, भगवान जाधव, विशाल वाळुंजे, किरण काळे आदींची उपस्थिती आहे. 

Edit-Pratap Awachar