सात दिवसात प्रश्न मार्गी लावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या !

प्रकाश बनकर
Tuesday, 11 August 2020

मराठा क्रांती ठोक मोर्चाचा ठाकरे सरकारला इशारा 

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ४२ हुतात्म्यांच्या कुटुंबियांतील एका सदस्याला सरकारी नोकरी व प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत तसेच आझाद मैदानावर ४७ दिवस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवेत सामावून घ्या, याचा निर्णय येत्या आठ दिवसांत घ्या. अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे गनिमा कावा पद्धतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समन्वयक रमेश केरे यांनी मंगळवारी (ता.११) पत्रकार परिषदेत दिला. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

श्री. केरे म्हणाले की, भाजप व शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. युती सरकारच्या काळात आंदोलनकर्त्यांची उध्दव ठाकरे यानी भेट घेत बलिदान दिलेल्या कुटुंबियांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्यापही मदत मिळालेली नाही. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी शहरातील क्रांतीचौक येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ८ तारखेपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

सरकारने पोलिस बळाचा वापर करीत आमचे आंदोलन दडपले. आमच्यावर गुन्हे दाखल केले. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले, तरी त्याची परवा नाही. पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले. त्या तरुणांच्या कुटुंबातील सदस्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. उद्या सरकार या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी कशी देणार, अशा प्रश्‍नही उपस्थित करतील. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

समन्वयक आप्पासाहेब कुढेकर म्हणाले, मागण्या आठ दिवसात मान्य करा, अन्यथा गनिमी कावा प्रमाणे आंदोलन करणार आहोत. हे भाजप पुरस्कृत आंदोलन असल्याच्या आरोपावर कुढेकर म्हणाले, अशोक चव्हाण यांना मराठा समाजाचे प्रश्‍न माहिती नाही. एवढे मोर्चे काढल्यानंतर ते निवेदन द्या सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

मदतीच्या प्रतिक्षेत 
यावेळी आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या प्रमोद होरेच्या आई जयमाला होरे म्हणाल्या की, आंदोलना दरम्यान युतीच्या सरकार वेळी उध्दव ठाकरे यांनी मदत मिळाली का या विषयी विचारपुस केली. मदत आणि नोकरीचे आश्‍वासन दिले होते. मात्र आद्यापही मदत मिळालेली नाही. अजूनही आम्ही मदतीच्या प्रतिक्षेत आहोत. असेही त्या म्हणाल्या. यावेळी बलिदान देणारे उमेश एंडावतचे वडील आसाराम एंडावतही उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Maratha Kranti Thok Morcha