esakal | यांनी केल्या उचापती बसला दणका...
sakal

बोलून बातमी शोधा

 Offence Registered Who Breaks Coronavirus Lockdown Order Rules

पानठेले व चहाटपरीसह इतर दहा जणांवर सहा पोलिस ठाण्यांमध्ये २६ मार्चला आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सत्तार रज्जाक बागवान (रा. पैठणगेट) हे लॉकडाऊनचे आदेश धुडकावून तोंडाला मास्क न बांधता फिरत होते.

यांनी केल्या उचापती बसला दणका...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - लॉकडाऊन झाल्यानंतरही विनाकारण शहरात धुडगूस घालणाऱ्या व फिरणाऱ्‍या लोकांवर पोलिसांनी कडक पावले उचलली. अशा लोकांवर आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

त्यातच पानठेले व चहाटपरीसह इतर दहा जणांवर सहा पोलिस ठाण्यांमध्ये २६ मार्चला आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सत्तार रज्जाक बागवान (रा. पैठणगेट) हे लॉकडाऊनचे आदेश धुडकावून तोंडाला मास्क न बांधता फिरत होते.

जितेश कन्हैयालाल बरेटिये (वय २२), उमेश कन्हैयालाल बरेटिये (३४), राजू कन्हैयालाल बरेटिये (४२), सत्यनारायण हुकूमचंद बरेटिये (२८), बबलू हुकूमचंद बरेटिया (३६, रा. दलालवाडी) हे आपसात धिंगाणा घालीत होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनाच्या धर्तीवर उपाययोजनेमध्ये अडसर आणून भंग करणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दुकान उघडून साहित्याची विक्री करणाऱ्या रईस खान शेर खान (५५, रा. बायजीपुरा), संजय अमरचंद पहाडिया (रा. राजाबाजार), रूपेश लक्ष्मीचंद खोलापुरे (रा. चेलीपुरा), ईश्वर जितेंद्र पाटणी (रा.चेलीपुरा, शहागंज) यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 
 

go to top