लाठ्या खा अन् ऊठबशाही काढा...

मनोज साखरे
बुधवार, 25 मार्च 2020

कोविड-१९ हा आजार संसर्गजन्य आहे; त्यासाठीच लॉकडाऊनचा उपाय करण्यात आला आहे. त्या धर्तीवर शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. वाहतुकीवरही बंधने टाकण्यात आली आहेत; परंतु काही नागरिक लॉकडाऊनचा अर्थ सहज घेत आहेत.

औरंगाबाद - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. यादरम्यान, नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत.

मात्र काहीजणांसह रिक्षाचालक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. अशांवर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. खासकरून आपण विनाकारण बाहेर फिरत असाल तर पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद मिळेलच; परंतु ऊठबशाही काढाव्या लागणार आहेत. त्यापेक्षा घरी बसा आणि काळजी घेतलेलीच बरी! 

कोविड-१९ हा आजार संसर्गजन्य आहे; त्यासाठीच लॉकडाऊनचा उपाय करण्यात आला आहे. त्या धर्तीवर शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. वाहतुकीवरही बंधने टाकण्यात आली आहेत; परंतु काही नागरिक लॉकडाऊनचा अर्थ सहज घेत आहेत.

अशा स्थितीत घरातच बसून राहण्याच्या वारंवार सूचना देऊनही काहीजण रस्त्यावर फिरत आहेत. त्यात रिक्षाचालकांवरही बरीच बंधने टाकण्यात आली आहेत. तरीही विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून, लाठ्यांचा मार तर आहेच शिवाय अशांना ऊठबशा काढण्याची वेळही आली. शहरात असे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले. 

हेही वाचा 

पाऊले थांबली पण इरादा बुलंद
पुण्यात सन्नाटा

या रिक्षाचालकांवर गुन्हे 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एजाज खान अजीज खान (वय २५ रा. अल्तमश कॉलनी), मोहसीन खान अजीम खान (वय २७, रा. नारेगाव), बिस्मिल्ला खान तब्बू (वय ५०, रा. नारेगाव), शेख ताहेर शेख रहेमान (रा. इंद्रानगर, बायजीपुरा) अशी संशयित रिक्षाचालकांची नावे आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. घरातच बसून राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

रिक्षाचालकांवरही बरीच बंधने टाकण्यात आली आहेत. रिक्षाचालक व त्यासोबत एका प्रवाशाला रिक्षातून येण्याची मुभा आहे. मात्र हे रिक्षाचालक तीन ते चार प्रवाशांना घेऊन प्रवास करीत होते. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली असून, जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

आपल्या घरातच रहा. अनावश्यक गर्दी टाळा, आपल्याला किराणा साहित्य आणायचे असेल तर एका घरातून एक व्यक्ती अर्ध्या तासासाठी घरातून निघा. अनावश्यकपणे दुचाकी, चारचाकी वाहनाने फिरू नका. आपल्या सुरक्षेसाठी पोलिस रस्त्यावर आहेत. त्यामुळे तुम्ही गर्दी टाळून आमची मदत करा. 
-चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त. 

हेही वाचा 

राज्यातील कोरोना विषाणुचा संसर्ग वाढला

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Offence Registered Who Breaks CoronaVirus Lockdown Order Rules